Sunday, April 6, 2025
Home अन्य ‘आंटीला काम मिळेना…’ नेटकऱ्याच्या टीकेवर अमृताने दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाली, ‘अहो आजोबा…’

‘आंटीला काम मिळेना…’ नेटकऱ्याच्या टीकेवर अमृताने दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाली, ‘अहो आजोबा…’

आपल्या लावणीच्या तालावर सर्वांना नाचायला लावणारी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर होय. अमृताने केलेली ‘वाजले की बारा’ ही लावणी प्रचंड प्रसिद्ध झाली. तिने मराठीसह बॉलीवूडमध्येस्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘चंद्रमुखी’, ‘चोरीचा मामला’ या मराठी चित्रपटांसह तिने ‘सत्यमेव जयते’, ‘राझी’, ‘फूंक’ अशा हिंदी चित्रपटांमध्येही काम करून तिने तिची ओळख निर्माण केली आहे. अमृता सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

अमृताचे (Amrita Khanwilkar) लाखो चाहते आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिचे युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. अमृताने ‘तिकीट टू महाराष्ट्र’ ही नवीन सीरिज सुरू केली आणि त्याच्या माध्यमातून ती राज्यातील नवनवीन ठिकाणांना भेट देताना दिसते. या सीरिजमधील पुण्याच्या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत अमृताला चांगेलच ट्रोल केलं होतं.त्या युजरला अमृताने सडेतोड उत्तर दिले आहे.

कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिले की, “काम मिळेना वाटतं आंटीला…” या नेटकऱ्याला अमृत्ताने खडेबोल सुनावले आहे. ती म्हणाली की, “अहो आजोबा हे कामच आहे…हा प्रवासाशी संबंधित असणारा एक प्रायोजित कार्यक्रम आहे. अच्छा, तुमच्या काळात हे युट्यूब वगैरे नसेल ना? म्हणून तुम्हाला या सोशल मीडियाच्या ताकदिची कल्पना नसेल. हरकत नाही.”

amruta khanvilkar

अमृता खानविलकरने या सीरिजच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध ठिकाणांना भेट दिली आहे. तिने या ठिकाणांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक सौंदर्याची माहिती दिली आहे. या सीरिजमध्ये अमृता खानविलकरसोबत तिची मैत्रीण आणि अभिनेता अभिषेक चव्हाण देखील दिसतो. अमृता खानविलकरच्या या सीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजने एका महिन्यात 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. अनेक प्रेक्षकांनी या सीरिजचे कौतुक केले आहे.टिकट टू महाराष्ट्र सीरिजच्या माध्यमातून अमृता खानविलकरने महाराष्ट्राला जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. या सीरिजमुळे महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे. (Amrita Khanwilkar told the trolling netizen)

आधिक वाचा-
‘या’ कारणामुळे अनुष्का शर्माने रणवीर सिंगला डेट केले नाही; म्हणाली, ‘मला तो आवडतो पण…’
भयंकर! ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न; ‘या’ व्यक्तीने वाचवला जीव

हे देखील वाचा