Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड अमृता फडणवीसांचं हिंदी चित्रपटातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर रंगलीय एकच चर्चा

अमृता फडणवीसांचं हिंदी चित्रपटातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर रंगलीय एकच चर्चा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. अमृता फडणवीस यांनी बँकिंग क्षेत्रात देखील आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. आपल्या गाण्यांमुळे आणि त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी त्या चांगल्याच प्रसिद्ध आहेत. विविध राजकीय विषयांवर त्या सोशल मीडियावरुन रोखठोक मांडताना दिसत असतात. त्यांच्या या वक्तव्यांमुळे अनेकदा त्यांच्यावर जोरदार टिका हि होताना दिसत असते. पण सध्या त्या चर्चेत आहेत त्यांच्या हिंदी चित्रपटातील गाण्यामुळे, त्यांचे हे गाण साेशल मीडियावर चांगलच चर्चेत आहे. 

अमृता फडणवीस यांच्या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचे संगीतावर असणारे प्रेम सर्वश्रुत असून त्यांनी गायन क्षेत्रात आपली एक स्वतंत्र आणि वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता संगीत क्षेत्रात एक पाऊल पुढे नेत, हिंदी चित्रपटात देखील त्यांनी गाणे गायले आहे. दिग्दर्शक अभय निहलानी यांच्या ‘लव्ह यू लोकतंत्र’ या हिंदी चित्रपटात प्रसिद्ध गायक शान यांच्यासोबत त्यांनी गायलेल्या गाण्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.

‘लव्ह यू लोकतंत्र’ या चित्रपटात अभिनेता अमीत कुमार यांनी अप्रतिम अभिनय केला असून अभिनेत्री स्नेहा उल्लाल, ईशा कोप्पीकर, रवी किशन (एमपी), मनोज जोशी, अली असगर, कृष्णा अभिषेक, सपना चौधरी, सुधीर पांडे, दयाशंकर पांडे, सुहासिनी मुळे, राज प्रेमी, हितेश संपत, राज ओझा यांसारखे प्रमुख बॉलिवूड कलाकार यांचा समावेश आहे.

आघाडीच्या चित्रपट समीक्षक आणि विश्लेषकांनी हा बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर ठरेल असा अंदाज वर्तवला आहे आणि सुरुवातीच्या पुनरावलोकनांमध्ये असे म्हटले आहे की, या चित्रपटात चांगल्या मनोरंजनाचे सर्व घटक आहेत आणि बॉलिवूडच्या चाहत्यांना तसेच सामान्य प्रेक्षकांना तो आवडेल.

‘लव्ह यू लोकतंत्र’ या चित्रपटातील गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रदर्शित होताच त्यांच्या ‘ना जाने क्यू धडकता है दिल’ या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत  हे गाणे युट्यूबवर हजाेराे लोकांनी पाहिले आहे. त्यामुळे सध्या त्यांचे हे गाणे चांगलेच व्हायरल होत असल्याचे दिसत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘माझी भूमिका तू साकारणार म्हणजे…’; सुष्मिता सेनच्या भूमिकेबद्दल गौरी सावंतने केली पोस्ट शेअर
‘या’ अभिनेत्रीने एका चित्रपटासाठी चक्क स्त्रीचे सौंदर्य खुलवणाऱ्या केसांनाच केले होते बाय- बाय?

हे देखील वाचा