Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

शायरीचा वापर करत अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा; म्हणाल्या, ‘इस शहर में मिल ही जाएँगे…’

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. त्यांची फॅन फॉलोविंग एखाद्या मोठ्या कलाकारापेक्षा कमी नाही. यामुळेच त्यांच्या पोस्ट शेअर होताच व्हायरल होऊ लागतात. याशिवाय त्या अनेकदा सामाजिक मुद्द्यावर भाष्य करताना देखील दिसतात.

नुकतीच त्यांची समोर आलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल बोलताना दिसत आहेत. महानगरीमधल्या खड्ड्यांसंबंधित ही पोस्ट आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अमृता एका रस्त्याच्यामध्ये उभ्या आहेत. त्यांच्या आजूबाजूला रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले आपण सहज पाहू शकतो.

हा फोटो शेअर करत अमृता म्हणतायेत की, “इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब, पर ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब !” एकंदरीत या पोस्टद्वारे त्यांनी शिवसेना आणि मुंबई महापालिकेवर, अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचे दिसून येत आहे. युजर्स देखील या पोस्टवर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. तसेच पोस्ट केल्यापासून ते आतापर्यंत या फोटोवर २० हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

अमृता फडणवीस प्रोफेशनली एक बँकर आहेत. मात्र कामाव्यतिरिक्त त्या वेगवेगळे छंद जोपासतात. त्यातलाच एक छंद म्हणजे गायकी! त्या नेहमी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे गाणे प्रेक्षकांसमोर सादर करतात. गाण्याच्या माध्यमातून देखील त्या विविध सामाजिक विषयांवर भाष्य करत असतात. या गाण्यांमुळे त्यांना बऱ्याचदा ट्रोलिंग सामना देखील करावा लागला आहे. मात्र या ट्रोलिंगकडे लक्ष न देता, त्या त्यांचे काम पुढे चालू ठेवतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आदिल खानसोबत जोरदार ठुमके लावताना दिसली शिल्पा शेट्टी; ‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावरचा धमाल परफोर्मेंस होतोय व्हायरल

-खरी-खुऱ्या आयुष्यातली ‘बार्बीडॉल’ आहे कॅटरिना कैफ; वाचा तिच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

-निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ‘डिज्नी प्रिंसेस’ दिसतेय रुबीना दिलैक; पाहा अभिनेत्रीच्या मनमोहक अदा

हे देखील वाचा