निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ‘डिज्नी प्रिंसेस’ दिसतेय रुबीना दिलैक; पाहा अभिनेत्रीच्या मनमोहक अदा


टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस १४’ ची विजेती स्पर्धक आणि अभिनेत्री रुबीना दिलैक ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. बिग बॉसच्या घरात तिचा हटके अंदाज, टास्क खेळण्याची पद्धत आणि लोकप्रियता त्यामुळे तिने हा शो जिंकला आहे. आधीपासून मालिकांमधून घराघरात पोहचलेल्या रुबीनाला बिग बॉसमध्ये खूप पसंती मिळाली. तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम आणि सपोर्ट मिळाला होता.

या शोमध्ये तिच्यासोबत तिचा पती अभिनव शुक्ला देखील होता. त्यामुळे त्यांच्यातील प्रेम सर्वांनी पाहिले आहे. या शोनंतर रुबीना खूप चर्चेत आली होती. तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये देखील कमालीची वाढ झाली आहे. ती तिच्या चाहत्यांसाठी रोज नवनवीन फोटो पोस्ट करत असते. अशातच तिचे काही ग्लॅमरस फोटो या दिवसात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Rubina dilaik share her share her blue dress glamorous photo on social media)

रुबीनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रुबीना अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिने ऑफ शोल्डर निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. यामध्ये तिने केसांची पोनी घातली आहे. तिने कोणतीही ज्वेलरी परिधान केली आहे. ती या फोटोमध्ये खूपच मनमोहक पोझ देताना दिसत आहेत. युजर्सला देखील तिचा हा अंदाज आवडला आहे. तिचे चाहते तसेच अनेक कलाकार तिच्या या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. तसेच तिने याच ड्रेसवरील एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

रुबीनाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘छोटी बहू’, ‘ससुराल सिमर का’, ‘शक्ती : अस्तित्व के एहसास की’, ‘सास बिना ससुराल’, ‘इश्क में मरजावा’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच याआधी रुबीनाचे ‘मरजानीया’ आणि ‘गलत’ हे गाणे रिलीझ झाले होते. मरजानिया गाण्यात ती तिचा पती अभिनव शुक्लासोबत दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-धक्कादायक! टी-सिरीजचा मालक असणाऱ्या भूषण कुमार विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

-हेमांगी कवीच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्टवर तृप्ती देसाईंनी उठवले प्रश्न; म्हणाल्या, ‘तेव्हा तू कुठे होतीस?’

-प्रवीण तरडेच्या ‘बलोच’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाले उत्साहाचे वातावरण


Leave A Reply

Your email address will not be published.