Thursday, April 17, 2025
Home मराठी …म्हणून अमृता खानविलकर कधीच करणार नाही पतीसोबत काम, मोठे कारण आले समोर

…म्हणून अमृता खानविलकर कधीच करणार नाही पतीसोबत काम, मोठे कारण आले समोर

नटरंग’ (Natrang) चित्रपटातील ‘वाजले की बारा’वर थिरकत, अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta khanvilkar) प्रेक्षकांची मने चोरली. आपल्या अप्रतिम नृत्य कौशल्याचा वापर करून तिने इंडस्ट्रीमध्ये आपली जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. याशिवाय अमृता आपल्या फिटनेसबाबत बऱ्याच चर्चा रंगवत असते. दरदिवशी वेगवेगळ्या योगा पोझेसचे वेगवेगळ्या पोस्ट्स शेअर करत, अभिनेत्री अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष वेधते. तिने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ही गोष्ट अनेकांना माहितच असेल की, तिने हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत (Himanshu Malhotra) लग्न केले आहे. त्यांची जोडी अनेकांना खूप आवडते. त्यांची ऑफस्क्रीन केमेस्ट्री सगळयांना खूप आवडते. या सेलिब्रेटी जोडप्याला ऑनस्क्रीन एकत्र बघण्याची अनेकांची इच्छा आहे. याबाबत त्यांना विचारले देखील होते. परंतु अभिनेत्याने असे काही उत्तर दिले की, ज्यामुळे त्यांचे चाहते काही प्रमाणात नाराज झाले आहे.

माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत हिमांशूला अमृतासोबत काम कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी हिमांशूने उत्तर दिले की, “अमृता माझ्यासमोर अभिनय करण्यास खूप लाजते. त्यामुळे तुम्ही आम्हाला एकत्र काम करताना पाहू शकणार नाहीत आणि आमच्यात हीच चर्चा झाली होती. आम्हाला काही ऑफर देखील आल्या होत्या. मात्र त्यावर अमृता म्हणाली की, “डान्स आणि अभिनय या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. अभिनय आपण एकत्र करू शकत नाही. कारण आपण जर अभिनय एकत्र केला तर प्रत्येक दिवशी आपल्याला एकमेकांसमोर अभिनय करावा लागेल. आपण शक्य तितके वास्तविक राहिले पाहिजे आणि एकत्र अभिनय करू नये असे अमृताला वाटते.” (amruta khanvilkar and her husbund himanshu malhotra will never work together)

त्यांचे हे उत्तर ऐकून त्याच्या चाहत्यांना काही प्रमाणात दुःख झाले आहे. त्या दोघांनी एकत्र कोणत्यातरी प्रोजेक्टमध्ये काम करावे अशी सगळ्यांची इच्छा होती. ते दोघेही कमालीचे कलाकार आहेत. अमृताने अनेक मराठी चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

अमृता खानविलकरने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर ती बऱ्याच चित्रपटात पाहायला मिळाली. इतकेच नव्हे, तर तिने हिंदी चित्रपटातही बऱ्याच महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीचा ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. यात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. याशिवाय लवकरच ती ‘पॉंडीचेरी’ या मराठी चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सनी देओलवर फसवणुकीचा आरोप! 26 वर्षापूर्वीची घटना

समंथाच्या अगोदर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत नात्यात होता नागा चैतन्य, तर ‘असा’ होता त्याचा सिनेसृष्टीतील प्रवास

हे देखील वाचा