‘नऊवारीतली नवरी!’ जांभळ्या रंगाची साडी नेसून, सोनाली कुलकर्णीने सादर केला तिचा पारंपारिक साज


मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही व्यस्त अभिनेत्रींमध्ये गणली जाते. ती सतत कोणत्या ना कोणत्या कामात स्वतःला व्यस्त ठेवणे पसंत करते. तिने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. सोनालीला मराठी चित्रपटसृष्टीत ‘अप्सरा’ म्हणून ओळखले जाते. तिला ही ओळख तिच्या ‘नटरंग’ या चित्रपटातून मिळाली. नुकताच या अप्सरेचा नवा साज समोर आला आहे. जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नेहमीच ती स्वतः ला वेगवेगळ्या लूकमध्ये सजवून फोटोशूट करत असते. तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकतेच आता तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिने सुंदर अशी नऊवारी साडी नेसली आहे. तिच्या साडीचा रंग जांभळा असून, त्यावर तिने मोरपंखी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. त्यासह तिने मेकअप आणि बांगड्या घालून तिचा हा पारंपारिक लूक पूर्ण केला आहे.

सोनालीने या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. पहिल्या फोटोत ती उभी राहून दुसरीकडे पाहताना पोझ देत आहे. दुसऱ्या फोटोत ती कॅमेऱ्याकडे पाहत पोझ देत आहे. यात ती एखाद्या नवरीसारखी दिसत आहे. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “नऊवारी”तली “नवरी” उषाचा लग्नातला गेटअप कसा वाटला ?”

तिच्या या फोटोंना आत्तापर्यंत ४८ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. चाहते तिच्या या फोटोंवर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिचा नुकताच ‘पांडू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तिने मराठी आणि हिंदीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून, तिला खरी ओळख रवी जाधव यांच्या ‘नटरंग’ चित्रपटातून मिळाली. या चित्रपटाने तिला तिच्या ओळखीसह ‘अप्सरा’ हे नवीन नाव देखील दिले. अगदी या नावाला साजेसे सौंदर्य असणारी सोनाली नृत्यातही पारंगत आहे.

हेही वाचा –


Latest Post

error: Content is protected !!