‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’वर थिरकत, अभिनेत्री अमृता खानविलकरने प्रेक्षकांची मने चोरली. आपल्या अप्रतिम नृत्य कौशल्याचा वापर करून तिने इंडस्ट्रीमध्ये आपली जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. याशिवाय अमृता आपल्या फिटनेसबाबत बऱ्याच चर्चा रंगवत असते. दरदिवशी वेगवेगळ्या योगा पोझेसचे वेगवेगळे पोस्ट्स शेअर करत, अभिनेत्री अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष वेधते. नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, जे सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
अमृता खानविलकरने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने ती अनोख्या अंदाजात पोझ देताना दिसत आहे. फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. यात आपण पाहून शकतो की, अमृता सोफ्यावर झोपली आहे. तसेच कधी हातातील फोनमध्ये बघत, तर कधी कॅमेऱ्याकडे बघत ती पोझ देत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांकडून खूप पसंत केले जात आहेत. (amruta khanvilkar’s eye catcher poses goes viral on social media)
अमृताने तिचे हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत केले जात आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांव्यतिरिक्त अनेक कलाकारांनी देखील कमेंट केली आहे. आतापर्यंत या फोटोवर ३६ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.
अमृता खानविलकरने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर ती बऱ्याच चित्रपटात पाहायला मिळाली. इतकेच नव्हे, तर तिने हिंदी चित्रपटातही बऱ्याच महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीचा ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ झाला आहे. यात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. याशिवाय लवकरच ती ‘पॉंडीचेरी’ या मराठी चित्रपटातही दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…