अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही मराठी सिनेसृष्टीतील एक अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती नेहमीच तिच्या वेगवेगळ्या स्टाईलने तिच्या चाहत्यांना प्रभावीत करत असते. तिच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो देखील सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच सोशल मीडियावर तिच्या एका चाहत्याने तिला लग्नाची मागणी घातलेली आहे. अमृताने देखील त्या मेसेजच्या स्क्रीनशॉट शेअर करून त्याला चांगलेच उत्तर दिलेले आहे.
अमृता खानविलकर तिच्या instagram वर चाहत्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे. या मेसेजमध्ये त्या व्यक्तीने लिहिलेले आहे की, “अमृता खानविलकर मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल. मी इंटरेस्टेड आहे. प्लीज मला तुझा कायम स्वरूपी नवरा व्हायचा आहे. मी इंडियन सुनील.” चाहत्यांच्या या मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊन अमृताने लिहिलेले आहे की, “हॅलो इंडियन सुनील मला ही ऑफर दिल्याबद्दल खूप आभारी आहे. पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. जरी तुला कायमस्वरूपी नवरा व्हायचे असेल, तरीही खरंच सॉरी.” अनेक वेळा अभिनेत्रींना चाहत्यांच्या अशा प्रश्नांना सामोरे जावे लागते. परंतु अमृताने मात्र त्याला योग्य उत्तर दिलेले आहे.
अमृताला आजपर्यंत आपण तिच्या अभिनय आणि डान्सच्या माध्यमातून सगळ्यांनी पाहिलेले आहे. अमृताने बॉलीवूडमध्ये देखील तिचे चांगले स्थान निर्माण केलेले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी अमृता ही संगीत मानापमान या चित्रपटात दिसलेली आहे. या चित्रपटातील कॅमिओ रोल केला होता. तसेच या चित्रपटातील तिच्या डान्सने देखील चाहत्यांना भुरळ घातलेली आहे. तसेच धर्मरक्षक महावीर संभाजी महाराज या चित्रपटात देखील दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये मिताली मयेकरचे सुंदर फोटोस; सोशल मीडियावर होतायेत व्हायरल
सैफ अली खानला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज कधी मिळणार? डॉक्टरांनी दिली माहिती