Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

एकदम कडक! अमायरा दस्तूरने केला चक्क हील्स घालून डान्स; व्हिडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस

बॉलिवूड अभिनेत्री अमायरा दस्तूरला सोशल मीडियावर सक्रिय राहणे खूप आवडते. अभिनेत्री कधी फोटोशूटने, तर कधी डान्स व्हिडिओंद्वारे सोशल मिडियावर धमाल करत असते. अमायरा दस्तूरने आता तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती चक्क हील्स घालून ‘डोन्ट रश’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. अमायरा दस्तूरचा हा डान्स व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहत्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

अमायराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तिच्या युनिक डान्स स्टाईलसह तिचा स्टायलिश अंदाजही दिसत आहे. व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 41 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “कारण आम्ही हा डान्स हील्समध्येही चांगल्या प्रकारे करू शकतो.” सध्या ‘डोन्ट रश’ गाण्यावरील बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

अमायराचा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचे कारण म्हणजे, तिची फॅन फॉलोविंग. इंस्टाग्रामवर अमायराला जवळपास 2.4 मिलियनहून अधिक चाहते फॉलो करतात.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ही अभिनेत्री नुकतीच सैफ अली खानच्या ‘तांडव’ वेबसीरिजमध्ये दिसली होती. अमायरा दस्तूरने 2013 साली ‘इस्काक‘ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिचे बरेच चित्रपट प्रदर्शित झाले.

अमायरा 2017 मध्ये चीन आणि भारत यांच्या सहकार्याने बनलेल्या ‘कुंग फू योद्धा’ मध्येही दिसली होती. या चित्रपटात जॅकी चॅन आणि सोनू सूद मुख्य भूमिकेत होते. ती तामिळ आणि तेलुगु भाषेत अनेक चित्रपट करत असते. सन 2017 मध्ये सैफ अली खानच्या ‘कालाकांडी’ चित्रपटातही अमायरा दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘नाही सलवार रंगब…’, होळीवरील नवीन भोजपुरी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, एकाच दिवसात लाखो हिट्स

-अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीने लावले ‘सैंया जी’ गाण्यावर ठुमके, स्टेप्स आणि एक्सप्रेशन्स पाहून चाहते घायाळ

-‘एक्सप्रेशन क्वीन’ अक्षरा सिंगला विचारला असा प्रश्न की भडकली अभिनेत्री, चिडलेल्या अंदाजावर चाहते फिदा; व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा