अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीने लावले ‘सैंया जी’ गाण्यावर ठुमके, स्टेप्स आणि एक्सप्रेशन्स पाहून चाहते घायाळ

arbaaz khan girlfriend giorgia andriani dance on saiyaan ji song video hits on internet


बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन ती चाहत्यांशी संबंधित राहते. जॉर्जिया एंड्रियानी तिच्या स्टाईल व्यतिरिक्त तिच्या डान्समुळेही खूप चर्चेत असते. सध्या तिचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे.

या व्हिडिओत ती नेहा कक्कर आणि हनी सिंग यांच्या ‘सैंया जी’ गाण्यावर दुबईच्या रस्त्यावर जोरदार डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओमधील जॉर्जियाचा  डान्स आणि तिची स्टाईल खरोखरच पाहण्यासारखी आहे.

जॉर्जियाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 78 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यासोबतच चाहते यावर कमेंट्स करून प्रतिक्रिया देत आहेत. जॉर्जियाचा हा व्हिडिओ दुबईमधला आहे. तिचे स्टेप्स आणि एक्सप्रेशन्स पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

हा व्हिडिओ शेअर करताना जॉर्जियाने लिहिले, “सैंया जी.” खरंतर अरबाज खानच्या गर्लफ्रेंडने तिच्या व्हिडिओ आणि फोटोंद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेण्याची ही पहिली वेळ नाही. या अगोदरही ती तिच्या व्हिडिओमुळे चर्चेत राहिली आहे.

जॉर्जियाच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर नुकतीच ती मीका सिंगसोबत ‘रूप तेरा मस्ताना’ या अल्बममध्ये देखील दिसली. हा अल्बम खूपच यशस्वी ठरला.

याशिवाय जॉर्जिया बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे याच्यासह बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यापूर्वी जॉर्जियाने ‘कॅरोलीन एँड कामाक्षी’ या वेब सीरिजमध्ये इटालियन एजंटची भूमिका केली होती. आजकाल ती दुबईमध्ये राहत आहे. पण तिथे राहत असतानाही ती तिच्या चाहत्यांशी जोडलेली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉट अभिनेत्री सनी लिओनीने ‘स्प्लिट्सविला एक्स ३’ शोचा प्रोमो केला शेअर, व्हिडिओत दिसला बोल्ड अंदाज

-आमिर खानच्या मुलीने कापले बॉयफ्रेंडचे केस, फोटो शेअर करत नुपूरने केली मजेशीर अंदाजात तक्रार

-अभिनेत्री ऐश्वर्याने शेअर केला समुद्र किनाऱ्यावरील भन्नाट फोटो, कॅप्शनमध्ये ‘बराक ओबामा’ यांच्या पत्नीचा उल्लेख


Leave A Reply

Your email address will not be published.