‘नाही सलवार रंगब…’, होळीवरील नवीन भोजपुरी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, एकाच दिवसात लाखो हिट्स

bhojpuri golu gold bhojpuri holi song naahi salwaar rangab naahi sameej ho released watch video here


वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरी या यूट्यूब चॅनेलवर सतत भोजपुरी गाणे रिलीझ केले जातात. विशेष म्हणजे, होळीच्या या हंगामात एकापेक्षा एक धमाल गाणे सादर करून, हे चॅनेल संगीत रसिकांची मने जिंकत आहे. रिलीझ झालेल्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. होळीला काही दिवस बाकी असतानाच यूट्यूबवर होळीची गाणी जोरदार धमाल करत आहेत.

भोजपुरी गायक गोलू गोल्ड यानेही वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर होळीसाठी एक गाणे रिलीझ केले आहे. या गाण्याचे बोल आहेत, “नाही सलवार रंगब नाही समीज हो.” विशेष म्हणजे हे गाणे रिलीझ होताच लोकप्रिय झाले आणि गाण्याला काही तासांतच लाखो व्ह्यूजही मिळाले आहेत.

गोलू गोल्डने हे गाणे त्याच्या खास स्टाईलमध्ये गायले आहे. गाणे भोजपुरी भाषिक लोकांच्या पसंतीस उतरले आहे. गोलू गोल्ड आणि शिल्पी राज यांच्या आवाजात गायलेले हे होळी गीत प्रेक्षक वारंवार पाहत आहेत. तसेच, भरभरून प्रेमही देत आहेत.

या मजेदार होळीगीताचे गीतकार अरुण बिहारी आहेत, तर संगीत आर्या शर्मा यांनी दिले आहे. व्हिडिओचे दिग्दर्शक आर्यन देव आहेत. यासोबतच, गाण्याची रेकॉर्डिंग अनिल यादव यांनी कालिका स्टुडिओमध्ये केली आहे.

गाण्याला यूट्यूबवर १९ हजाराहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे, तर सुमारे १०००हून अधिक लोकांनी व्हिडिओवर कमेंट्स करून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीने लावले ‘सैंया जी’ गाण्यावर ठुमके, स्टेप्स आणि एक्सप्रेशन्स पाहून चाहते घायाळ

-‘एक्सप्रेशन क्वीन’ अक्षरा सिंगला विचारला असा प्रश्न की भडकली अभिनेत्री, चिडलेल्या अंदाजावर चाहते फिदा; व्हिडिओ व्हायरल

-व्हिडिओ: ‘दिल डुबा’ गाण्यावर प्राचीचा हटके अंदाज, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात


Leave A Reply

Your email address will not be published.