Friday, August 1, 2025
Home मराठी आनंद शिंदे यांनी मीरा आणि जय यांना दिली गाण्याची ऑफर, आगामी काळात झळकणार एकत्र

आनंद शिंदे यांनी मीरा आणि जय यांना दिली गाण्याची ऑफर, आगामी काळात झळकणार एकत्र

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाने नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. हे पर्व चांगलेच गाजले होते. शोमधील सगळ्या स्पर्धकांशी प्रेक्षक अगदी जोडले गेले होते. दररोज ९: ३० वाजले की, अवघ्या महाराष्ट्राला वेध लागायचे हे बिग बॉसचे. परंतु आता हे पर्व संपले आहे, तर सगळ्यांना चुकल्यासारखे वाटत आहे. घरात असताना अनेक स्पर्धकांची घट्ट मैत्री पाहायला मिळाली आहे. अशातच घरात उत्कर्ष शिंदे, जय दुधाने आणि मीरा जगन्नाथ यांची मैत्री चांगलीच गाजली होती.

बिग बॉसच्या घरात असताना त्या तिघांनी प्लॅन करून प्रत्येक टास्क जिंकला आहे. सुख दुःखात एकमेकांना साथ दिली आहे. वेळ आल्यास एकमेकांना विरोधात भांडले देखील आहेत. मदतीचा हात पुढे केला आहे. तिघेही टॉप ६ मध्ये होते. तिघांनीही खूप चांगला खेळ खेळला आहे.  ( Ananad shinde give offer to jay dudhane and meera jagnnath in his upcoming song)

अशातच अशी माहिती समोर आली आहे की, उत्कर्ष शिंदेचे वडील आनंद शिंदे यांनी मीरा जगन्नाथ आणि जय दुधाने यांना एका गाण्याची ऑफर दिली आहे. ते दोघे लवकरच आनंद शिंदे यांनी गायलेल्या गाण्यात एकत्र दिसणार आहे. ही बातमी ऐकून त्यांच्या त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. घरात असताना जय आणि मीराची मैत्री देखील सगळ्यांना खूप आवडली होती. जय हा बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा उपविजेता झाला आहे. त्याला देखील प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. विशाल निकमने या पर्वात बाजी मारून ट्रॉफी त्याच्या नावी केली आहे.

उत्कर्ष शिंदे याने देखील त्याच्या गाण्याची कला बिग बॉसमध्ये दाखवली आहे. त्याने बिग बॉसच्या घरात असताना त्याच्या विनोदी स्वभावाने प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन केले आहे.

हेही वाचा :

‘भाऊने माझा केसाने गळा कापला असता’, म्हणत कुशल बद्रिकेने शेअर केला भाऊ कदमसोबतचा ‘तो’ किस्सा

अजय देवगणच्या लेकीचे बोल्ड फोटो होतायत इंटरनेटवर व्हायरल, तुम्ही पाहिले का?

‘अंगात आलया’ गाण्यावर जॉनी लिव्हरने धरला मुलांसोबत ठेका, पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात है

 

हे देखील वाचा