उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट(Anant – Radhika pre wedding )यांच्या लग्नाची चर्चा जोरदार सुरु आहे. अशातच सर्वांना आतुरता लागली आहे ती म्हणजे त्यांच्या प्री-वेंडिग सोहळ्याची. लग्नापूर्वी १ ते ३ मार्च दरम्यान प्री-वेंडिग समारंभ आयोजित केला आहे. नुकतचं या सोहळ्यासंदर्भात नवी अपडेट्स समोर आली आहे. प्री-वेडिंग फंक्शनसाठी खास थीम आयोजीत केली आहे. तसेच पाहुण्यांना खास ड्रेस कोड परिधान करावा लागणार आहे.
अनंत-राधिकाच्या (Anant – Radhika pre wedding ) लग्नाचे फंक्शन गुजरातमधील जामनगरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात बॉलिवूड सेलेब्ससह जगभरातील अब्दाधिश हजेरी लावणार आहेत. दरम्यान, पाहुण्यांना नऊ पानांचं इव्हेंट गाईड आणि वॉर्डरोब प्लॅनर पाठवण्यात आलं आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग सोहळ्यात पाहुण्यांनी कोणता पोषाख करावा, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था कशी असेल, या बाबतची माहिती या गाईडमध्ये देण्यात आली आहे.
काय म्हटले आहे गाईडमध्ये?
पहिल्या दिवशी ‘अॅन इव्हिनिंग इन एव्हरलँड’ अशी थीम आहे. या दिवसासाठी ड्रेस कोड “एलिगंट कॉकटेल” ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी ‘अ वॉक ऑन द वाइल्डसाइड ही थीम असेल. या दिवसासाठी जंगल फीव्हर’ असा ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे.
या दिवशी होणारे कार्यक्रम जामनगरमधील अंबानींच्या अॅनिमल रेस्क्यू सेंटरच्या आवारात आयोजित केले जातील. या कार्यक्रमासाठी पाहुण्यांना कंफर्टेबल शूज आणि कपडे घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा कार्यक्रम सकाळी ११.३० ते दुपारी ३ पर्यंत असणार आहे.
तसेच, तिसऱ्या दिवशी ‘मेला रो’ साठी ‘सफारी-थीम’असेल. यासाठी ड्रेस कोड “डॅझलिंग देसी रोमान्स” आहे, त्यामुळे पाहुण्यांनी पारंपरिक दक्षिण आशियाई कपडे परिधान करायचे आहेत. हा कार्यक्रम ७.३० वाजता सुरु होणार. तर सकाळी ११ ते २ दरम्यान लंचचा प्लॅन केलेला आहे. यावेळी “कॅज्युअल चिक” ड्रेस कोड परिधान करण्यास सांगितले आहे. तसेच यादिवशी संध्याकाळी ६ वाजता राधा कृष्ण मंदिरामध्ये हस्तक्षर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी पाहुण्यांची यादी समोर आली होती. या यादीत जागतिक पातळीवरील प्रभावशाली नेते, अब्जाधीश, बॉलीवूडमधील स्टार आणि अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत.
हेही वाचा:
Titeeksha-Siddharth Wedding : देऊनी वचन साताजन्माचे…तितिक्षा – सिद्धार्थ अडकले विवाहबंधनात
Aaradhya Bachchan: ‘ती खुप समजूतदार…’, अन् नव्या नवेली नंदाने केलं आराध्याचं कौतुक