छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके (Titeeksha Tawde And Siddharth Bodke Wedding) यांचा विवाह थाटामाटात पार पडला. त्यांचा लग्नसोहळा पार पडताच सोहळ्यातील काही गोड क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले. चाहते दोघांवर नव्या आयुष्याच्या प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
सिद्धार्थ आणि तितिक्षा गेली काही वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यांनी एक फोटो शेअर करत त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. आज अखरे त्यांनी सातजन्माची गाठ बांधली.
तितिक्षा आणि सिद्धार्थने त्यांच्या लग्नासाठी पेस्टल करलची निवड केली होती. तितिक्षाने ऑफ व्हाईट आणि गोल्डन किनार असलेली नऊवारी नेसली होती, तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट कलरचा कुर्ता आणि गोल्डन रंगाचं धोतरं घातलं होतं. त्यांच्या लग्नाच्या या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
View this post on Instagram
कालपासून तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नसमारंभाला सुरुवात झाली होती. हळद, साखरपुडा, संगीत असे सगळे कार्यक्रम पार पडले. त्यानंतर आता ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे.
View this post on Instagram
त्यांच्या लग्नाला अनेक मित्रमैत्रिणीपरिवारासह मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री अनघा अतुल, रसिका सुनील, ऋतुजा बागवे, सुरुची अडारकर, ऐश्वर्या नारकर ही कलाकारमंडळी दिसली.
दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, सिद्धार्थ बोडके आणि तितीक्षा तावडेने ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. अभिनेत्रीने आतापर्यंत ‘असे हे कन्यादान’, ‘तू अशी जवळी रहा’, ‘सरस्वती’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याशिवाय सिद्धार्थ बोडके ‘दृश्यम २’ या बॉलीवूड चित्रपटात व नुकताच ‘श्रीदेवी प्रसन्न’मध्ये झळकला होता.