Thursday, April 18, 2024

अनन्या आणि आदित्यच्या नात्याबाबत रणवीर सिंगने दिला हिरवा कंदील, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

काल अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनचा शेवटचा दिवस होता. हे फंक्शन 1 मार्च ते 3 मार्च पर्यंत चालले. गुजरातमधील जामनगर येथे झालेल्या या भव्य कार्यक्रमात देशातील आणि जगातील दिग्गज व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. या भव्य सोहळ्यात जवळपास संपूर्ण बॉलिवूड सहभागी झाले होते. या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच या पार्टीतील एक फोटो मात्र चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

या फोटोमध्ये रणबीर कपूर बी-टाऊनच्या नवीन लव्ह बर्ड्स आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेसोबत मस्ती करताना दिसत आहे. आदित्य आणि रणबीरला एकत्र पाहून तुम्हाला ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटाची आठवण होईल.

तर रणबीर या कपलला थम्स अप देत आहे. त्यामुळे कुठेतरी रणबीरने आदित्य आणि अनन्याच्या नात्याबाबत माहिती सांगण्याच्या प्रयत्न केला आहे. असा अंदाज सगळेजण वर्तवत आहेत. या फोटोमध्ये हे तिन्ही स्टार्स खूप खुश दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवर प्रत्येकजण प्रेमाचा वर्षाव करत आहे.

अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूर के रिश्ते को रणबीर कपूर ने दिखाई हरी झंडी! बिना बोले कही ये बात

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर अनेकदा त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत राहतात. दोघेही अनेकदा एकत्र क्वालिटी टाइम घालवताना दिसले आहेत. मात्र, अजूनही दोघांनीही त्यांच्या नात्याला दुजोरा दिलेला नाही.

हा तीन दिवसीय भव्य कार्यक्रम संस्मरणीय बनवण्यात अंबानी कुटुंबाने कोणतीही कसर सोडली नाही. पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रिहाना आणि दिलजीतच्या दमदार परफॉर्मन्सपासून ते बॉलीवूडच्या तिन्ही खानांचा एकत्र डान्स पाहुण्यांसाठी ट्रीटपेक्षा कमी नव्हता.सेलिब्रेशनचा शेवटचा दिवस आणखी अविस्मरणीय बनवण्यासाठी अनेक प्रसिद्ध बॉलिवूड गायकांना बोलावण्यात आले. हॉलिवूड गायक एकोननेही शेवटच्या दिवशी आपला दमदार परफॉर्मन्स दिला. नीता अंबानी यांच्या शेवटच्या दिवशीही आरती करण्यात आली, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

रणबीर-आलियाच्या राहाला पहिल्यांदाच भेटला अभिषेक बच्चन, चिमुकलीने सोशल मीडियावर पुन्हा केला कल्ला
डॉनच्या डायलॉगवर अभिनय करताना दिसले मुकेश अंबानी, पत्नी नीतासोबतचा व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा