Wednesday, July 16, 2025
Home बॉलीवूड एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाणाऱ्या अनन्या पांडेचे पार्टी फोटो व्हायरल

एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाणाऱ्या अनन्या पांडेचे पार्टी फोटो व्हायरल

 

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अं’मली पदार्थांच्या केसमध्ये आता अनन्या पांडेचे नाव आले आहे. गुरुवारी २१ऑक्टोबर रोजी एनसीबीने तिच्या घरावर छापा टाकला होता. आर्यनसोबत अंमली पदार्थांबाबत झालेल्या व्हाट्सएपच्या चॅटमध्ये तिचे नाव समोर आले आहे.

त्यांची ही गांज्याबद्दलची चॅटिंग २०१८ ते २०१९ दरम्यान झाली होती. सध्या तिचे दोन्ही फोन एनसीबीने जप्त केले आहेत. यावेळी तिला अं’मली पदार्थांबद्दलचे, चॅटिंगबद्दलचे अनेक प्रश्न विचारण्यात आले. जेव्हा तिच्यावर प्रश्नांचा भडीमार झाला तेव्हा ती खूप गोंधळली. तिला नीट आठवत नाही असे सांगत तिने अनेक प्रश्नांची उत्तरं देणे टाळले. तसेच तिला आज २२ ऑक्टोबरला पुन्हा चौकशीसाठी बोलवले होते.

आणण्याची एनसीबी चौकशी होत नाही तोपर्यंत तिचे पार्टी करत असतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अनन्या नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या पोस्टमुळे ती सतत चर्चेत देखील येत असते. तिला पार्टी करायला खूप आवडते आणि ती नेहमीच पार्टीमध्ये जाताना दिसते. स्टारकिडसोबत ती सगळ्या पार्ट्यांमध्ये मस्ती करताना दिसत असते. आपल्या उत्कृष्ट आऊटफिटने ती प्रत्येक पार्टीमध्ये आकर्षकच दिसते. यासोबत ती बॉलीवूडच्या मोठ्या कलाकारांसोबत नाईट पार्टीज देखील करते.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही अनन्याची चांगली मैत्रिणी आहे. ह्या दोघींना नेहमीच सोबत बघितले जाते. चंकी पांडेची मुलगी असलेल्या अनन्याने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती ‘पति पत्नी और वो’ सिनेमात दिसली होती.

एका शो दरम्यान तिने तिच्या संघर्षाबद्दल सांगितले होते. यावर अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी म्हणाला होता की, “बरोबर आहे, मेहनत तर सगळ्यांचीच असते. पण येथे एवढाच फरक आहे की, जेथे आपली स्वप्ने पूर्ण होतात, तिथेच यांची मेहनत सुरू होते.”

अनन्या पांडेने २०१७ मध्ये मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आहे. तिला प्रवासाची करण्याची खूप आवड असून, ती नेहमीच तिच्या मित्रमैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जाते. तिला नृत्य आणि वाचनाचीही खूप आवड आहे. तिला चॉकलेट आणि पिझ्झा सर्वात जास्त आवडतात.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

साध्याभोळ्या अंतराने वेस्टर्न ड्रेस परिधान करत लावले जोरदार ठुमके, चाहता म्हणाला, ‘विषय संपला’

अरे भारीच की! ‘बाहुबली’ चित्रपट येणार मराठी भाषेत, ‘हे’ दोन कलाकार देणार चित्रपटाला आवाज

यहुदी संस्कृतीची माहिती देणारा, भयपटांच्या अजून एक पाऊल पुढे जाणारा ‘डिबुक’ लवकरच होणार प्रदर्शित

हे देखील वाचा