Sunday, June 23, 2024

आधीच अफेअरच्या चर्चा, त्यात सोशल मीडियावर पोस्ट करत ‘अनन्याने’ माजवली खळबळ; एकदा वाचाच

अनन्या पांडे ही बॉलिवूडच्या तरुण व लोकप्रिय अभिनेत्रींपेकी आहे. तिच्या सौंदर्य, फॅशन सेन्स आणि चित्रपटांमुळे ती नेहमी चर्चेत असते. विशेषतः ही अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय आहे. ती नेहमी तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. अनन्या पांडे सध्या अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबतच्या तिच्या नात्याच्या अफवांमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने ‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरिज विषयी लिहिले आहे. चला तर बघूया अनन्याने पोस्ट मध्ये काय लिहिले आहे?

अनन्याने (Ananya Pandey) आदित्यच्या (Aditya Roy Kapur) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द नाईट मॅनेजर’ (The Night Manager) या वेब सीरिजचे कौतुक केले आहे. त्यानंतर अफवांना अधिकच उधाण आले. तर आदित्यच्या वेब सीरिजच्या स्क्रीनिंगमध्येही ही अभिनेत्री स्पॉट झाली होती. अनन्याने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘द नाईट मॅनेजर’चे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि शोभिता धुलिपाला दिसत आहेत. यासोबत अनन्याने लिहिले आहे की, ”सो बिंगी! #द नाईट मॅनेजर ‘जस्ट कांट गेट इनफ ऑफ.’ म्हणजेच एवढेसे पुरेसे नाहीए.”

Ananya Panday
Photo Courtesy: Instagram/ananyapanday

या एका पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. दोघांच्या अफेर जोरदार चर्चा सुरू आहे. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. यापूर्वी दोघेही मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले होते. कतारमध्ये फिफा वर्ल्ड कप सेमीफायनलसाठीही ते एकत्र दिसले होते. करण जोहरने कॉफी विथ करण ७ या शोमध्ये एका पार्टीत त्या दोघांना सोबत बघितल्याचा उल्लेख केला होता. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या अफवा सुरू झाल्या. अनन्याने चॅट शोमध्ये असेही म्हटले होते की तिला आदित्य ‘हॉट’ वाटतो. (ananya-pandey-share-instagram-post-on-the-night-manager-aditya-roy-kapur)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आईच्या सांगण्यावरून साईन केला ‘हा’ चित्रपट; करिश्माने केला मोठा खुलासा
स्मृती इराणीची लेक शेनेलच्या रिसेप्शनमध्ये शाहरुखचीच हवा, एकदा पाहाच फाेटाे

हे देखील वाचा