Friday, March 31, 2023

आईच्या सांगण्यावरून साईन केला ‘हा’ चित्रपट; करिश्माने केला मोठा खुलासा

प्रत्येक अभिनेत्रींच्या करियरमध्ये त्या अनेक सिनेमे करतात आणि त्या सिनेमांमधून त्यांना ओळख मिळते. मात्र प्रत्येकीच्या आयुष्यात असा एक सिनेमा असतो जो तिच्या संपूर्ण करियरला एक चांगली कलाटणी देतो आणि टॉपला जातो. अभिनेत्री करिश्मा कपूरने देखील तिच्या सौंदर्याने आणि तिच्या अभिनयाने ९० चे दशक गाजवले. तिने देखील तिच्या करियरमध्ये एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले. असाच तिच्या करियरमधील एक सिनेमा म्हणजे ‘दिल तो पागल है’ हा करिश्माच्या करियरमधील सर्वात उत्तम सिनेमा म्हणून ओळखला जातो. नुकतेच लोलो म्हणजेच करिश्मा एका शो मध्ये पाहुणी म्हणून गेली होती. त्यावेळी तिने ‘दिल तो पागल है’ या चित्रपटाविषयी मोठा खुलासा केला.

या चित्रपटाने नृत्याची नवीन शैली केली निर्माण
‘दिल तो पागल है’ (Dil To Pagal Hai) या चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला. शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) या दोघांची चित्रपटात मुख्य भुमिका होती. या चित्रपटातील सदाबहार गाणी आज लोकांना भुरळ घालतात. या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये (bollywood) नृत्याची एक नवीन शैली निर्माण केली. मात्र करिश्मा (Karisma Kapoor) हा चित्रपट करण्यास तयार नव्हती. आईच्या सांगण्यावरून तीने हा चित्रपट साइन केला.

अमेझिंग लव्ह ट्रँगल’
‘दिल तो पागल है’ हा नव्वदच्या दशकातील सुपरहिट चित्रपट होता. चित्रपटाची कथा आणि गाण्यांनी लोकांना वेड लावले. या चित्रपटात शाहरुख आणि माधुरीची जोडीही लोकांना खूप आवडली होती. अक्षय कुमारची देखील या चित्रपटाचा महत्त्वाची भुमिका होती. शाहरुख आणि माधुरी यांनी एकत्र केलेला हा तिसरा चित्रपट होता. यापूर्वी दोघेही ‘कोयला’ आणि ‘अंजाम’ सारख्या सुपरहिट चित्रपटात दिसले होते. ‘अमेझिंग लव्ह ट्रँगल’ या चित्रपटात पाहायला मिळाला, लोकांना तो खूप आवडला.

4 अभिनेत्रींनी ‘या’ चित्रपटात काम करण्यास दिला होता नकार
जेव्हा करिश्मा कपूर इंडियन आयडॉलमध्ये या शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती. त्यावेळी तिने सांगितले की, हा चित्रपट करण्यापूर्वी तीला खूप चिंता वाटत कारण या चित्रपटात माधुरी आधीच होती. माधुरी दीक्षितसोबत डान्स करण्याच्या भीतीने चार अभिनेत्रींनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचेही तीने सांगितले. कारण माधुरी एक उत्कृष्ट डान्सर आहे आणि तिच्या सोबत परफॉर्म करणे कोणासाठीही सोपे काम नव्हते.

करिश्मा आहे माधुरी दीक्षितची मोठी फॅन
करिश्माच्या म्हणण्यानुसार, जेव्हा यश चोप्रा आणि त्यांचा मुलगा आदित्य चोप्रा यांनी तिला स्क्रिप्ट सांगितली तेव्हा ती खूप घाबरली होती. तीने चित्रपट करण्यास नकार दिला. तेव्हा तीच्या आईने तीला समजावले की तीने हे आव्हान स्वीकारावे. तीने असेही सांगितले की आई म्हणाली होती, की तू माधुरी दीक्षितची खूप मोठी फॅन आहेस, मग तू ही भूमिका केली पाहिजे. तू फक्त मेहनत कर आणि बघ तुझ्या या व्यक्तिरेखेची सर्वत्र प्रशंसा होईल. त्यानंतर कुठेतरी करिश्मा या चित्रपटात काम करण्यास तयार झाली.

‘या’ पात्रासाठी मिळाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार
या चित्रपटात करिश्मा कपूरने माधुरीसोबत उत्तम भूमिका साकारली होती. दोघांनीही आपापल्या पात्रांना पूर्ण न्याय दिला. करिश्माला हे पात्र करायला आधी भीती वाटत होती, पण नंतर तिला याच पात्रासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. (about-dil-to-pagal-hai-movie-secret-share-karishma-kapoor-in-indian-idol-show)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसाद ओकच्या यशस्वी कारकिर्दीत ‘या’ व्यक्तीचा सिंहाचा वाटा
करिश्मा तन्नाच्या बिकिनीतील फोटोशुट एकदा पाहाच

हे देखील वाचा