अभिनेत्री अनन्या पांडे सध्या जोरदार चर्चेत आहे. आर्यन खान अं’मली पदार्थ प्रकरणात तिचे नाव समोर आल्याने नुकतेच काही दिवसांपूर्वी एनसीबीने तिला चौकशीसाठी बोलावले होते. याबाबत नाव समोर आल्याने अभिनेत्रीने तिची शूटिंग काही दिवस थांबवली होती. याचा परिणाम तिच्या ब्रँड व्हॅल्यूवथ देखील पडला आहे. या वेळी एनसीबीने सलग दोन दिवस तिला चौकशीसाठी बोलावले होते. यावेळी तिचा लॅपटॉप पुढच्या चौकशीसाठी जप्त केला होता. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार अनन्याने तिची शूटिंग पुन्हा एकदा चालू केली आहे.
अनन्या तिचा आगामी चित्रपट ‘लायगर’च्या शूटिंगसाठी विजय देवरकोंडासोबत चित्रपटातील एका गाण्याची शूटिंग करणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, तिने आता या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटातील गाण्याची शूटिंग २५ ऑक्टोबर रोजी होणार होती. परंतु एनसीबीने चौकशीसाठी बोलावल्यामुळे तिला शूटिंग थांबवावी लागली होती. (Actress ananya Pandey start shooting for liger with Vijay devarakonda )
या गाण्याची शूटिंग मुंबईमध्येच होणार आहे. हे गाणे चेन्नईचे बाबा भास्कर यांनी कोरीओग्राफ केले असून, ‘लायगर’ची निर्मिती धर्मा प्रोडक्शनद्वारे पुरी जगन्नाथ औकर चार्मी कौर यांनी केली आहे. या चित्रपटाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा चालू आहे. चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात विजय देवरकोंडा आणि माईक टायसन हे कलाकार असल्याने प्रेक्षक या चित्रपटकडे खूप आशेने बघत आहेत. या चित्रपटाचे बजेट १२५ कोटी एवढे आहे.
या चित्रपटात रोनित रॉय, रम्या कृष्णन, विष्णू रेड्डी, अली मकरंद, आणि गेटअप श्रीनू हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट तेलुगू आणि हिंदीमध्ये शूट केला जात आहे. तसेच इतर भाषांमध्ये देखील डब केला जाणार आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबर २०२१ रोजी प्रदर्शित करायचा होता परंतु कोरोना महामारिमुळे चित्रपटाची शूटिंग थांबण्यात आली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–‘माझ्यासोबत एका दिग्दर्शकाने सेटवरच केली होती शिवीगाळ’, ईशा गुप्ताचा खुलासा
–अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ फोटो पाहिल्यावर तुम्ही देखील नक्कीच म्हणाल, ‘वय हा फक्त आकडा आहे’
–‘कोणाचीही मुलगी, बहीण किंवा आई असूदे, मी तिच्याशीच लग्न करणार’, वाचा परेश रावल यांची लव्हस्टोरी










