×

सोज्वळ ‘अंगूरी भाभी’ने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्वच मर्यादा, ही वेबसिरीज पाहून प्रेक्षकही झाले थक्क

‘भाभी जी घर पर हैं’ या टीव्ही मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारून शिल्पा शिंदेने (Shilpa Shinde) घराघरात आपले स्थान निर्माण केले होते. या व्यक्तिरेखेने शिल्पाला इतकी प्रसिद्धी दिली की, चाहते तिला तिच्या नावाने नाही, तर अंगूरी भाभी या नावाने हाक मारू लागले. पण तुम्हाला माहित आहे का की, या शोमध्ये दिसलेली सुसंस्कृत अंगूरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदेने काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या वेबसीरिजमध्ये असे सीन्स दिले होते की, जे पाहून प्रेक्षकांचे डोळे उघडेच राहिले.

‘पौरुषपुर’मध्ये दिले कमालीचे बोल्ड सीन्स
‘पौरुषपुर’ असे या वेबसीरिजचे नाव आहे. ‘पौरुषपुर’ वेबसीरिजमध्ये सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारणाऱ्या शिल्पाने तिच्या इमेजपेक्षा वेगळे बोल्ड सीन्स दिले होते. हे सीन्स इतके बोल्ड होते की, शिल्पा शिंदेचे अंगूरी भाभीचे पात्र तिच्यासमोर पूर्णपणे फिके पडले होते.

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shinde (@shilpa_shinde_official)

राणी मीराबतीची साकारली होती भूमिका
‘पौरुषपुर’मध्ये (Paurashpur) शिल्पा शिंदेने राणी मीराबतीची भूमिका साकारली होती. ज्यामध्ये ती राजाची काळजी घेण्यासाठी नवीन राण्या आणते. या वेबसीरिजमध्ये राणी मीराबती बनण्यासाठी शिल्पा शिंदेने जड ड्रेस परिधान केला होता. त्यासोबतच दागिनेही भारी होते.

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shinde (@shilpa_shinde_official)

जाणून घ्या काय आहे ‘पौरुषपुर’ वेबसीरिजची कथा
‘पौरुषपुर’ ही एक पीरियड ड्रामा वेबसीरिज आहे. ज्यामध्ये प्रेम, वासना आणि सूडाची कथा दाखवण्यात आली आहे. या सीरिजमध्ये एका दुर्बल आणि कमी स्वभावाच्या राजाची कथा दाखवण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shinde (@shilpa_shinde_official)

बिग बॉस ११ ची आहे विजेती
अंगूरी भाभीची भूमिका साकारून शिल्पा शिंदेने केवळ चर्चेत नाही, तर तिने ‘बिग बॉस ११’ चे विजेतेपदही पटकावले. या शोमध्ये शिल्पाला विकास गुप्तासोबत चांगलाच वाद पाहायला मिळाला. अंगूरी भाभीची व्यक्तिरेखा सोडण्याची कथाही खूप गाजली. मात्र, या सर्व गोष्टी असूनही शिल्पा शिंदेने ‘बिग बॉस ११’चे विजेतेपद पटकावले.

हेही वाचा :

Latest Post