‘तरुण दिसण्यासाठी पितात सापाचे रक्त’, म्हणणाऱ्या ट्रोलरला अनिल कपूर यांनी दिले जबरदस्त प्रत्युत्तर


कलाकार जेवढी लोकप्रियता चित्रपटांमधून मिळवता तेवढीच ते सोशल मीडियावर सक्रिय राहून देखील मिळवत असतात. आजच्या काळात सोशल मीडिया हे कलाकारांच्या लोकप्रियतेचा मापदंड ठरत आहे. सोशल मीडियावरील कलाकारांची सक्रियता आणि त्यांचे फॉलोवर्स त्यांना काम मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावत असतात. या सोशल मीडियाने नवीन जुन्या सर्वच कलाकारांना भुरळ घातली आहे. कलाकारांच्या पोस्टवर त्यांचे फॅन्स विविध प्रतिक्रिया त्यांना देताना आपण अनेकदा बघतो, मात्र याच प्लॅटफॉर्मचा वापर करून कलाकारांना ट्रोल करणे, त्यांच्याबद्दल कोणत्याही चुकीच्या आक्षेपार्ह कमेंट्स करणे देखील ओघाने येतेच.

या सोशल मीडियावरील चुकीच्या कमेंट्सवर आधारित अभिनेता, निर्माता अरबाज खानचा ‘पिंच’ नावाचा शो आहे. यामध्ये येणाऱ्या कलाकरांना त्यांच्यावर होणाऱ्या चुकीचा कमेंट्स दाखवल्या जातात आणि त्यावर त्यांचे मतं विचारले जातात. या शोचे सध्या दुसरे पर्व सुरू आहे. नुकतीच या शोमध्ये एव्हरग्रीन अशा अनिल कपूर यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यावर झालेल्या विचित्र आणि भन्नाट कमेंट्स त्यांना ऐकवल्या गेल्या. यावर त्यांनी काय सांगितले जाणून घेऊया.

वयाच्या ६४ व्या वर्षी देखील अनिल कपूर यांचा फिटनेस आणि त्यांचे टिकलेले तारुण्य पाहून सर्वांनाच सुखद धक्का बसतो. त्यांच्या याच मोठ्या गोष्टीवर काही कमेंट्स अरबाजने वाचून दाखवल्या. ज्यात एकाने म्हटले आहे, “मला वाटते की अनिल कपूर हे स्वतःसोबत प्लॅस्टिक सर्जन घेऊन फिरतात.” एकाने लिहिले आहे की, “अनिल कपूर बहुतेक सापाचे रक्त पीत असतील.” या कमेंट्स पाहून अनिल कपूर यांनी विचारले की, ‘या खरंच कमेंट्स आहेत की, तुम्ही पैसे देऊन केल्या आहेत?’ यावर अरबाज म्हणतो, ‘या खरंच अशा कमेंट्स आहेत.’

या कमेंट्सवर उत्तरं देताना अनिल कपूर म्हणाले, “खरंच मी वैयक्तिकरित्या, व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या खूप नशीबवान आहे, की मला इतके चांगले जीवन जगता येत आहे. मला फॅन्सचे मिळणारे प्रेमच चांगले दिसण्यासाठी प्रेरित करते. प्रत्येकाच्याच जीवनात चांगले वाईट दिवस येतात मात्र यात मी लकी ठरलो. जर तुम्ही २४ तासांपैकी एक तास तुमच्या स्वतःसाठी काढू शकत नसाल तर काहीच अर्थ नाही.”

एकाने ट्रोलरने कमेंटमध्ये लिहिले होते की, ‘अनिल कपूर आणि सोनम कपूर पैशांसाठी काहीही करू शकतात” यावर अनिल कपूर म्हणाले, “कदाचित ट्रोलरचा दिवस खराब असेल”

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सलमान, शाहरुख अन् आमिर घाबरतात कारण…’, नसिरुद्दीन शाह यांनी साधला तिन्ही खानांवर निशाणा

-‘शिवगामीदेवी’ची भूमिका साकारून मेगास्टार झाल्या रम्या; बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन्ससाठी सतत असायच्या चर्चेत

-OMG! यामी गौतमच्या चेहऱ्याची ही काय झाली हालत, पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे


Leave A Reply

Your email address will not be published.