अभिनेत्री श्रिया सरनवर ‘लामा’ नावाच्या आफ्रिकन प्राण्याने केला हल्ला, फोटोसाठी पोज देणं पडलं महागात

animal attacks south indian actress shriya saran during her vacation with husband andrei koscheev watch viral video bhojpuri south ashas


दक्षिण भारतीय अभिनेत्री श्रिया सरन अभिनयासोबतच तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठीही ओळखली जाते. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये अभिनय करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. आजकाल श्रिया तिचा पती एंड्रे कॉस्चीवसमवेत पेरूमध्ये सुट्ट्या घालवत आहे. दरम्यान या जोडप्याने माचू पिचूलाही भेट दिली. 2007 साली माचू पिचूला जगातील सात चमत्कारांमध्ये स्थान देण्यात आले होते.

श्रीयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या ट्रीपसंबंधित एक फोटो आणि दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. फोटोमध्ये श्रिया आणि तिचा पती अत्यंत रोमँटिक स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहेत. पण त्यातील सर्वात मजेशीर आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे श्रियाने पोस्ट केलेला एक व्हिडिओ.

तिने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कॅमेलीड प्रजातीचा दक्षिण अमेरिकन लामा प्राणी दिसला आहे. श्रिया आणि तिचा पती या प्राण्याजवळ व्हिडिओ बनवताना दिसतात. या व्हिडिओमध्ये श्रिया पोज देत बसली होती आणि त्यातील लामापैकी एका लामाने तिच्यावर हल्ला केला. तो लामा श्रियाच्या दिशेने पळू लागतो. लगेच ती घाबरून तिथून उठते आणि तिच्या वाटेने पळून जाते. व्हिडिओमध्ये श्रियाच्या नवऱ्याचा हसण्याचा आवाजही येत आहे. दुसर्‍या व्हिडिओमध्ये श्रियाचा पती त्या प्राण्याचा जवळ जाऊन व्हिडिओ बनवत आहे, ज्यामध्ये तो प्राणी खूपच गोंडस दिसत आहे.

साल 2018 मध्ये, श्रिया सरन आणि एंड्रे कॉस्चीव विवाहबंधनात अडकले होते. दोघांचे हे भव्य लग्न राजस्थानच्या उदयपुरात पार पडले. एंड्रे हा रशियाचा रहिवासी आहे. जो आता इंग्लंडमधील बार्सिलोना येथे राहतो. आता तो एक उद्योजक आहे ज्याच्याकडे सेंद्रिय शेतीतून पिकवलेले अन्न विकल्या जाणाऱ्या रेस्टॉरंट्सची साखळी आहे. एकेकाळी तो टेनिसपटूही होता.

श्रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयचे झाले, तर श्रियाने आगामी चित्रपट ‘गमनम’ मध्ये एका मूक मुलीची भूमिका साकारली आहे. यासह, ती राजामौलीच्या पीरियड ड्रामा फिल्म ‘आरआरआर’ मध्ये अजय देवगणसोबत दिसणार आहे. श्रियाचा तमिळ चित्रपट ‘नरगासूरन’ देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.