Saturday, March 2, 2024

अॅनिमलच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहचले अनेक स्टार्स, आलियाच्या खास टी-शर्टने वेधले लक्ष

रणबीर कपूरच्या (Ranbir kapoor) ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची लो बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपट थिएटरमध्ये येण्यापूर्वी निर्मात्यांनी मुंबईत त्याचे विशेष स्क्रीनिंग आयोजित केले होते. या कार्यक्रमात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी दिसले.

या कार्यक्रमात रणबीरची पत्नी आलियाने तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अॅनिमलच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये आलिया भट्ट खूपच स्टायलिश दिसत होती. तिने काळ्या पँटसोबत ब्लॅक ब्लेझर घातला होता. ज्यामुळे ती आकर्षक दिसत होती. कमीत कमी मेकअप आणि खुल्या केसांमध्ये ही अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. विशेष म्हणजे तिने पतीच्या चित्रपटातील पात्राचा खास टी-शर्ट परिधान केला होता. कार्यक्रमात तिच्यासोबत सोनी राजदान, बहिण शाहीन भट्ट आणि महेश भट्टही दिसले.

एका फोटोमध्ये नीतू कपूर तिचा मुलगा रणबीरसोबत दिसली होती. दोघांच्याही चेहऱ्यावर चित्रपटाविषयीचा उत्साह स्पष्ट दिसत होता. याशिवाय या कार्यक्रमात शक्ती कपूरही दिसले. शाहीद कपूरच्या कबीर सिंग नंतर अॅनिमल हा संदीप रेड्डी वंगा यांचा बॉलिवूडमधील दुसरा दिग्दर्शकीय उपक्रम आहे.

संदीपसोबतचा रणबीरचा हा पहिलाच चित्रपट आहे. यात रणबीरसोबत रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांचाही समावेश आहे. आगाऊ बुकिंगमध्ये या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. रणबीरच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा सलामीवीर ठरेल, असे मानले जात आहे. या चित्रपटाची टक्कर विकी कौशलच्या सॅम बहादूरशी होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘मला रोमँटिक भूमिकेत सगळ्यांनी प्रेम केले पण आता…’ नागा चैतन्यची पोस्ट व्हायरल
स्ट्रगलच्या दिवसांत हॉटेलात गाणी गायचे उदित नारायण, तब्बल 10 वर्षांनंतर ‘या’ गाण्याने मिळाली ओळख

हे देखील वाचा