Thursday, February 22, 2024

स्ट्रगलच्या दिवसांत हॉटेलात गाणी गायचे उदित नारायण, तब्बल 10 वर्षांनंतर ‘या’ गाण्याने मिळाली ओळख

नव्वदच्या दशकात प्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्या मधुर आवाजाने सर्वांना वेड लावले होते. त्यांना त्या काळात रोमँटिक गाण्यांचे बादशाह मानले जायचे. त्यांनी एका सिंगिंग रियॅलिटी शोमध्ये सांगितले होते की, “मी चित्रपटांमध्ये गायक म्हणून माझे नाव उदित नारायण ठेवले आहे, परंतु माझे पूर्ण नाव उदित नारायण झा आहे.” शुक्रवारी (1 डिसेंबर) उदित त्यांचा 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने त्यांच्या संघर्षमय जीवनाविषयी जाणून घेऊया…

उदित नारायण (Udit Narayan) यांचा जन्म 1 डिसेंबर, 1955 रोजी बिहारमधील सुपौल येथे झाला. त्यांचा जन्म मैथिली ब्राह्मण कुटुंबात झाला. गायकाला 2009 मध्ये पद्मश्री आणि 2016 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांना 4 फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी संबंधित गोष्टी जाणून घेऊया. उदित यांनी त्यांच्या स्ट्रगलच्या दिवसांमध्ये खूप मेहनत केली आहे. आपला खर्च भागवण्यासाठी ते हॉटेलमध्ये गाणी गात असत. त्यांनी 1970 मध्ये नेपाळच्या रेडिओमधून लोकगायक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘सिंदूर’ या नेपाळी चित्रपटातून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. पण यामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली नाही.

‘पापा कहते हैं’मधून मिळाली ओळख
उदित यांना 10 वर्षे कोणताही मोठा ब्रेक मिळाला नाही. ते खर्च भागवण्यासाठी छोट्या-छोट्या फंक्शन्स आणि हॉटेल्समध्ये गाणी गात असत. त्यादरम्यान त्यांची भेट संगीत दिग्दर्शक चित्रगुप्ता यांच्याशी झाली. त्यांनी एक भोजपुरी गाणे सादर केले आणि त्यांच्या दोन मुलांची मिलिंद चित्रगुप्त आणि आनंद चित्रगुप्त यांची ओळख करून दिली. आनंद आणि मिलिंद यांनी उदित यांचा आवाज ऐकला आणि तो त्यांना खूप आवडला. त्यांनी उदित यांना ‘पापा कहते हैं’ गाण्याची संधी दिली.

हे गाणे सुपरहिट झाले आणि उदित एका रात्रीत स्टार झाले. हे गाणे 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कयामत से कयामत’ चित्रपटातील आहे. उदित यांची कारकीर्द या गाण्यातून बनायला सुरुवात झाली. यानंतर उदित यांनी शाहरुख खान, अमिताभ बच्चन, आमिर खान, अजय देवगण यांच्यासह अनेक कलाकारांच्या चित्रपटांमध्ये आपल्या सुरेल आवाजाची जादू पसरवली. गायकाने केवळ हिंदीच नाही, तर तमिळ, बंगाली, भोजपुरी, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

उदित नारायण यांनी केली आहेत दोन लग्न
उदित नारायण हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले आहेत. त्यांनी दोन लग्ने केली आहेत. पहिले लग्न रंजना नारायण झा आणि नंतर दीपा नारायणशी झाले. सुरुवातीला त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला स्वीकारण्यास नकार दिला, परंतु नंतर जेव्हा पत्नीने कोर्टात जाऊन त्यांच्या लग्नाचे फोटो दाखवले, तेव्हा त्यांनी गृहीत धरले की, ती आपली पहिली पत्नी आहे आणि तिचा ते संपूर्ण खर्च उचलतील. उदित आणि दीपा यांचा मुलगा आदित्य नारायण, जो प्ले बॅक सिंगर आणि होस्ट आहे.

अधिक वाचा-
‘जन्माला आली तशीच…’, उर्फीने खिडकीत थांबून ‘तसला’ फोटो शेअर करताच भडकला चाहता
पहिल्या पत्नीच्या लपवून उदित नारायण यांनी केलेलं दुसरं लग्न; खुलासा झाल्यावर दिलेला नकार

हे देखील वाचा