अभिनेत्री अनिता हसनंदानीने इंडस्ट्रीला ठोकला राम राम! एवढे मोठे पाऊल उचलण्याचे कारणही केले स्पष्ट


टेलिव्हिजनवरील ‘नागिन’ या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री अनिता हसनंदानी ही सध्या वैयक्तिक आयुष्यात खूप व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका मुलाला जन्म दिला आहे. त्याच्या मुलाचे नाव आरव असे ठेवले आहे. ती नेहमीच तिच्या मुलासोबत क्यूट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने तिच्या करिअरबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे तिचे चाहते खूपच हैराण झाले आहेत. तिने सांगितले अभिनयाला राम राम ठोकला आहे. तिने तिच्या एका मुलाखतीत इंडस्ट्री सोडण्यामागचे कारण सांगितले आहे.

अनिताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, “महामारीमुळे नाही पण तसेही मी इंडस्ट्री सोडणार होते. मला घरी माझ्या मुलासोबत वेळ घालवायचा आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, काम हा विषय सध्या माझ्या डोक्यातच नाहीये. मला खरंच माहीत नाहीये की, मी परत कधी येणार आहे.”

तिने हे देखील सांगितले की, ती आता काम करत आहे, कारण या आधी तिने कॉन्ट्रॅक्ट साईन केले होते. अनिता आणि रोहित रेड्डी यांचे लग्न 2013 मध्ये झाले होते. या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात ते आई- वडील झाले आहेत.

अनिताने ट्वीट करत असेही म्हटले आहे की, ती जेव्हा तयार असेल, तेव्हा ती पुन्हा कामावर रुजू होईल.

अनिता हसनंदानीने छोट्या पडद्यावरील अनेक मोठ्या मालिकांमध्ये काम केले आहे. एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात तिने आपले स्थान निर्माण केले आहे. पण आता तिचा हा निर्णय ऐकून तिचे चाहते नाराज झाले आहेत. तिने सांगितले की, तिने आधीच ठरवले होते की, तिला बाळ झाल्यावर ती ही इंडस्ट्री सोडून फक्त बाळाकडे लक्ष देणार आहे. तरीही अनिता पुन्हा एका प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी तिचे चाहते आशा व्यक्त करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रेग्नंसीच्या वृत्तांमध्ये समोर आला अभिनेत्रीचा बेबी बंपसोबतचा पहिला फोटो; ६ महिने गरोदर असल्याचा दावा

-‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज; नेहमीप्रमाणेच सायरा बानो यांची होती त्यांना साथ

-‘मीच माझ्या स्वप्नातली स्त्री!’, भाग्यश्री मोटेच्या हॉट ऍंड ब्यूटीफुल फोटोसोबतच लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत


Leave A Reply

Your email address will not be published.