‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज; नेहमीप्रमाणेच सायरा बानो यांची होती त्यांना साथ


ज्येष्ठ अभिनेते आणि ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले दिलीप कुमार यांच्या प्रकृतीशी संबंधित एक अपडेट समोर आली आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. अभिनेत्याच्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती देण्यात आली आहे. तसेच त्यांचे मित्र फैसल फारुकी यांनी चाहत्यांच्या प्रेम व आपुलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

दिलीप साहेबांच्या तब्येतीशी संबंधित प्रत्येक अपडेट त्याच्या ट्विटर अकाउंटवर देण्यात येत आहे. ट्वीटमध्ये लिहिले होते, “आपल्या सर्वांच्या प्रेम व प्रार्थनेसह दिलीप साहेब रुग्णालयातून घरी जात आहेत. तुमचे असीम प्रेम व आपुल्य नेहमीच साहेबांसाठी हृदयस्पर्शी ठरले आहे.”

दिलीप कुमार यांना श्वास घेण्यात अडथळा येऊ लागल्याने, काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे एक नॉन कोव्हिड रुग्णालय आहे. तपासणीमध्ये समोर आले होते की, त्याच्या फुफ्फुसामध्ये द्रव पदार्थ जमा झाला आहे. तो द्रव पदार्थ गेल्या बुधवारी काढून टाकण्यात आला.

दिलीपकुमार यांच्या डिस्चार्जनंतर सायरा बानो म्हणाल्या की, “आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांच्या फुफ्फुसातून तो द्रव पदार्थ काढून टाकला गेला आहे. आता आम्ही त्यांना घरी घेऊन जात आहेत. सर्व प्रार्थनेबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो.”

दिलीपकुमार आणि सायरा बानो यांच्या नात्याबद्दल बोलायचे झाले, तर त्यांच्या लग्नाला तब्बल ५४ वर्षे पूर्ण झाली आहेत. याशिवाय त्या दोघांच्या वयात जवळपास २२ वर्षांचे अंतर आहे. असे असूनही हे वयाचे अंतर त्यांच्या प्रेमामध्ये कधी अडथळा बनले नाही. दोघांच्या लग्नाला बरीच वर्षे लोटली आहेत, पण या दोघांचेही नाती पूर्वीसारखेच आहे. सायरा दिलीप साहेबांची पूर्ण काळजी घेतात. चांगला किंवा वाईट काळ असो, त्या नेहमी दिलीप साहेबांच्यासोबत ठामपणे उभ्या असतात. दोघांना बर्‍याचदा एकत्रही पाहिले जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये परदा हटा दो’ गाण्यावरील मानसी नाईकच्या एक्सप्रेशन्सवर तिचा पतीही झाला फिदा; कमेंट करत म्हणतोय, ‘ये चांद…’

-उर्वशीच्या पोटात एका व्यक्तीने दणादण मारल्या बुक्क्या; त्रास होत असूनही अभिनेत्रीने गपगुमान केले सहन

-जेनेलियासोबत रितेश करत होता रोमान्स; तिचा हात समजून केले ‘या’ दिग्दर्शकाच्या हातावर किस, पुढं काय झालं पाहाच…


Leave A Reply

Your email address will not be published.