प्रेग्नंसीच्या वृत्तांमध्ये समोर आला अभिनेत्रीचा बेबी बंपसोबतचा पहिला फोटो; ६ महिने गरोदर असल्याचा दावा


बंगाली सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाची खासदार नुसरत जहाँ मागील काही दिवसांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आहे. ती पती निखिल जैनपासून वेगळी राहत असून घटस्फोटाची वेळ आली आहे. अशामध्ये माध्यमांतील वृत्तांमध्ये नुसरत ६ महिने गरोदर असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, आता नुसरत जहाँच्या व्हायरल फोटोंनी या वृत्तांची पुष्टी केली आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये अभिनेत्रीचे क्यूट बेबी बंप दिसत असून ती कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहे.

बेबी बंप केले फ्लॉन्ट
खरं तर नुकतेच सोशल मीडियावर नुसरत जहाँचे काही ताजे फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा सैल गाऊन घातल्याचे दिसत आहे. या फोटोत तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे. दुसरीकडे तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाचा ग्लोदेखील दिसत आहे. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

सोबत दिसल्या दोन अभिनेत्री
व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये नुसरतसोबत बंगाली सिनेसृष्टीतील दोन प्रसिद्ध अभिनेत्रीही दिसत आहेत. त्या अभिनेत्री म्हणजेच तनुश्री आणि श्रावंती होय. खरं तर नुसरतच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी त्या दोघीही तिथे पोहोचल्या होत्या.

दोन वर्षांपूर्वी केले होते निखिलशी लग्न
अभिनेत्री नुसरत जहाँने दोन वर्षांपूर्वी म्हणजेच १९ जून, २०१९ रोजी व्यावसायिक निखिल जैनसोबत लग्न केले होते. नुसरत आणि निखिल तुर्कीमध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर त्यांनी कोलकाता येथे लग्नाचे रिसेप्सन ठेवले होते. हिंदू मुलासोबत लग्न केल्यामुळे नुसरत चांगलीच चर्चेत आली होती. मुस्लिम असूनही ती आपल्या भांगेत निखिलच्या नावाचा सिंदूर लावत गळ्यात मंगळसूत्र घालायची. यामुळे तिला टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र, वेळेनुसार त्यांच्या नाते बिघडत गेले आणि गोष्टी माध्यमात पसरल्या.

नुसरतचे चित्रपट
नुसरतने सन २०११ साली ‘शात्रू’ या बंगाली चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘खोका ४२०’, ‘खिलाडी’, ‘हर हर व्योमकेश‘, ‘झुल्फिकार’ यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मीच माझ्या स्वप्नातली स्त्री!’, भाग्यश्री मोटेच्या हॉट ऍंड ब्यूटीफुल फोटोसोबतच लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत

-‘ये परदा हटा दो’ गाण्यावरील मानसी नाईकच्या एक्सप्रेशन्सवर तिचा पतीही झाला फिदा; कमेंट करत म्हणतोय, ‘ये चांद…’

-उर्वशीच्या पोटात एका व्यक्तीने दणादण मारल्या बुक्क्या; त्रास होत असूनही अभिनेत्रीने गपगुमान केले सहन


Leave A Reply

Your email address will not be published.