Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

इंडस्ट्रीत ‘काॅर्नर’मध्ये टाकल्याच्या वक्तव्यावर प्रियांकाच्या मॅनेजरने साेडले माैन; म्हणाली, ‘अखेर तू…’

प्रियांका चोप्राने इंडस्ट्रीमध्ये स्वत:ला ‘काॅर्नर’मध्ये टाकल्याच्या वक्तव्याने सर्वांनाच चकित केले होते. तिच्या याच वक्तव्यावर आता मॅनेजर अंजुला आचार्य हिची प्रतिक्रिया समोर आली आहे. एका ट्विटला उत्तर देताना अंजुला हिने प्रियांकाबाबत घडलेल्या गैरवर्तनबाबत सांगितले आहे. ती म्हणाली की, जेव्हा मी पहिल्यांदाच प्रियंकाला टिव्हीवर पाहिली तेव्हाच मला माहित हाेत की, ती “ग्लोबल स्टार” आहे.

खरे तर, अलीकडीच एका पॉडकास्टमध्ये, प्रियांका (priyanka chopras) बॉलीवूड आणि हिंदी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये हाेणाऱ्या राजकारणाबाबत बाेलली. ती म्हणाली, ‘इंडस्ट्रीतील काही लोकांसोबत माझे मतभेद असल्यामुळे मला चित्रपटांमध्ये कास्ट केले जात नाही. यासाेबत तिने अंजुलाने तिला कशाप्रकारे पाठिंबा दिला याबाबतही सांगितले.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

एक वर्षापूर्वी अंजुलाने खुलासा केला होता की, ‘तिला प्रियांका चोप्रासोबत काम करायचे आहे, पण इंडस्ट्रीतील लोक तिला यासाठी मनाई करत आहेत.’ फोर्ब्सशी बोलताना अंजुला म्हणाली होती की, ‘जेव्हा त्यांनी एकत्र काम करायला सुरुवात केली तेव्हा प्रियांकाभोवती खूप ‘नकारात्मकता’ होती.’ अंजुलाने खुलासा केला की, ‘फिल्म इंडस्ट्रीतील काही महत्त्वाच्या लोकांनी तिला प्रियंकासोबत काम न करण्याचा इशारा दिला.’ आणि तिला सांगितले की, “ती कधीच काम करणार नाही, तू तुझा वेळ का वाया घालवत आहेस हे मला कळत नाही.”

अंजुला तेव्हापासून प्रियांकाच्या साेबत आहे, जेव्हापासून प्रियांकाने अमेरिकेला जाण्यासाठी आणि अमेरिकतर करिअर करण्याासठी भारत साेडले हाेते. प्रियांका आणि अंजुला ऑस्कर 2023मध्ये साऊथ एशियन एक्सलन्समध्येही एकत्र दिसल्या होत्या.(anjula acharia reacted bollywood actress priyanka chopras being cornered in the industry statement)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिंहासनासाठी होणार महायुद्ध; ‘पोन्नियन सेल्वन 2’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, ऐश्वर्या राय ठरली लक्षवेधक

ये रिश्ता क्या कहलाता है? परिणीती चक्क पॅपराझींना टाळत बसली राघव चढ्ढाच्या गाडीत अन्…

हे देखील वाचा