Friday, April 18, 2025
Home अन्य लग्नानंतरच्या विधींमध्ये विकीला ‘या’ नावाने चिडवताना दिसली अंकिता, व्हिडिओ झाला व्हायरल

लग्नानंतरच्या विधींमध्ये विकीला ‘या’ नावाने चिडवताना दिसली अंकिता, व्हिडिओ झाला व्हायरल

नुकतीच टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री असलेली अंकिता लोखंडे तिच्या बॉयफ्रेंड असलेल्या विकी जैनसोबत विवाहबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाआधीच्या सर्व विधींपासून ते अगदी लग्नाच्या रिसेप्शनपर्यंत सर्वच कार्यक्रमांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. या सर्व व्हिडिओंमध्ये अंकिता तिच्या लग्नच सर्वच फंक्शन मस्त एन्जॉय करताना दिसली. अनेकांनी तर असेही म्हटले की, आपल्याच लग्नात एवढी मजामस्ती करणारी अंकिता पहिलीच मुलगी असेल. अंकिताचे लग्न झाल्यानंतर तिच्या लग्नाचे आता लग्नानंतरच्या विधींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये देखील तिची नॉनस्टॉप मस्ती पाहायला मिळत आहे.

नवीन व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये अंकिता तिच्या सासरी दिसत असून, तिने गुलाबी रंगाची साडी नेसली असून, हातात हिरवा चुडा, कानात सोनेरी झुमके, गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू अशा अतिशय सध्या मात्र आकर्षक लूकमध्ये दिसत आहे. तर विकीने काळ्या रंगाचा शर्ट घातला आहे. अंकिताचा हा नव्या नवरीचा लूक नेटकऱ्यांना खूपच आवडत आहे. या दोघांच्या समोर दोन ताटं दिसत असून, त्यात गव्हाचे पीठ ठेवले आहे. त्या पिठावर विकीला नाव लिहायचे आहे. जेव्हा विकी त्यावर नाव लिहिताना दिसतो, तेव्हा अंकिता त्याला त्रास देताना दिसते आणि जोरात ओरडत मंकू बोलते. हे ऐकून विकी थांबतो आणि नंतर दोघेही हसायला लागतात.

याआधी देखील अंकिताच्या अगदी संगीत, मेहेंदी, हळदीच्या व्हिडिओंमध्ये देखील ती तुफान मस्ती करताना दिसली. तिच्या संगीत समारंभात अंकिता सर्वात जास्त नाचताना दिसली होती. नुकताच तिच्या रिसेप्शनच्या जेवणाचाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून, यात अंकिता जेवायला बसली असली तरी ती बसून डान्स करताना दिसत आहे. तत्पूर्वी १४ डिसेंबर रोजी अंकिता आणि विकीने मुंबईत पारंपरिक पद्धतीने लगीनगाठ बांधली. अंकिताच्या सर्व समारंभात जवळपास संपूर्ण इंडस्ट्रीचा दिसली. कंगना रानौत सुद्धा अंकिताच्या संगीत समारंभात आली होती. तिच्या मैत्र मैत्रिणींनी अंकिताचे लग्न खूप एन्जॉय देखील केले.

हेही वाचा-

हे देखील वाचा