Monday, March 4, 2024

अंकीता लोखंडे आणि मुनव्वर फारुकी यांच्या मैत्रीत फुट? शोमध्ये आले नवीन वळण

बिगबॉस 17 हा शो त्याच्या अंतिम टप्यात आहे.  दरम्यान स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस वाढलेली दिसून येत आहे. बिगबॉस17 चे 17वे नाॅमिनेशनचे टाॅर्चर टास्क झाले. ज्यात दोन टीम एकमेकांच्या विरुद्ध होत्या. एका टीममध्ये मुनावर फारुकी, मनारा चोपडा, अभिषेक कुमार(Abhishek Kumar) आणि अरुण माशेट्टी होते. तर दुसर्या टीममध्ये अंकिता लोखंडे(Ankita lokhande), विक्की जैन(Vicky Jain), आयशा खान(Ayesha Khan) आणि ईशा मालवीयहे (Isha Malviya) होते. या टास्कमध्ये अंकिता लोखंडेच्या टीमने मुनावर फारुकीच्या टीमला ३ डिग्री टॅार्चर केले.

बिगबॉसमध्ये अनेकदा नात्यांचे रंग बदलतांना दिसतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा बिगबॉसच्या 17व्या पर्वात आली .अंकिता लोखंडे आणि मुनावर फारुकी यांच्यात शोच्या सुरुवीतीला चांगली मैत्री होती. पण आता मात्र यांच्यात फुट पडल्याचे दिसून येत आहे.

३डिग्री टॅार्चर

टाॅर्चर टास्कमध्ये अंकिताच्या टीमने मुनावरच्या टीमला ३डिग्री टॅार्चर केले. पण शेवटी बिगबॉसने असा काही गेम पलटवला की, बाजी मुनावरच्या टीमने मारली. आणि अंकिताच्या टीमच्या सगळेच नॅामिनेट झाले. यानंतर बिगबॉसच्या घरात घमासान सुरु झाले.

अंकिता लोखंडे आणि मुनावर फारुकी यांच्या नात्यात दुरावा

बिगबॉसचा फिनाले सुरु होण्याआधी भावा बहीणीच नात सांगणारे अंकिता लोखंडे आणि मुनावर फारुकीयांच्या नात्यात फुट पडतांना दिसुन येत आहे. टाॅर्चर टास्क झाल्यानंतर अंकिता, मुनावरला भित्रा व कायर बोलली. यावर मुनावर भडकला. बघता बघता अंकिता आणि मुनावरचा वाद शिगेला पोहचला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

रणबीरच्या ‘ऍनिमल’ चित्रपटावर सनी लियोनीची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘प्रत्येक गोष्टीला सहमत होण्याची गरज नाही’
रणबीरच्या ‘ऍनिमल’ चित्रपटावर सनी लियोनीची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘प्रत्येक गोष्टीला सहमत होण्याची गरज नाही’

हे देखील वाचा