Friday, December 6, 2024
Home बॉलीवूड रणबीरच्या ‘ऍनिमल’ चित्रपटावर सनी लियोनीची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘प्रत्येक गोष्टीला सहमत होण्याची गरज नाही’

रणबीरच्या ‘ऍनिमल’ चित्रपटावर सनी लियोनीची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘प्रत्येक गोष्टीला सहमत होण्याची गरज नाही’

रणबीर कपूर ( ranbir kapoor) अभिनीत ऍनिमल चित्रपटाने ए सर्टीफिकेट मिळवूनही जगभरात जलवा दाखवला आहे. चित्रपटावर झालेल्या टीका आणि वादानंतरही या चित्रपटाने देशांतर्गत तसेच जागतिक बाॅक्स ऑफिसवर अनेक रेकाॅर्ड मोडले आहेत. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या ऍक्शन ड्रामा चित्रपटात, ‘हिंसक पुरुषत्व’ दाखवल्यामुळे या चित्रपटावर अनेकजण टीका करत होते. मध्यंतरी सुप्रसिद्ध गायक जावेद अख्तर यांनी ‘लिक माय शू’ या डायलाॅगवर आक्षेप घेताना दिसले होते. सर्व स्टारसनंतर आता सनी लियोनीनेही ऍनिमल चित्रपटाविषयी तिची प्रतिक्रिया मांडली आहे.

नुकतेच सनी लियोनीने तिची एआय रेप्लिका लाँच केली होती. लाँच इवेंटनंतर सनीने मिडियाशी संवाद साधताना ऍनिमलवर(animal) होणाऱ्या टीकेवर तिचं मत व्यक्त केलं आहे. फिल्मच्या यशाबद्दल आणि त्यावर केल्या गेलेल्या टीकेवर तिचे मत व्यक्त करताना ती म्हणाली,”चित्रपटाबाबतीत चांगली गोष्ट ही आहे की, चित्रपट पाहायचा की नाही हे पर्याय आपल्याकडे असतात. परंतु मनोरंजनाच एक वर्तुळ आहे. त्यात सर्वकाही परत येते, आधी मंदी होती आणि आता लोक पुन्हा चित्रपटगृहात जात आहेत , तिकिट खरेदी करत आहेत. तसेच फॅमिलीसोबत टाइम घालवण्यासाठी इच्छुक आहेत.”

ऍनिमलच्या यशाला पाठिंबा देत सनी म्हणाली, ” कोणता सिनेमा पाहायचा आहे याचं स्वातंत्र्य प्रेक्षकांकडे असायला हवं, त्यांनी कोणता चित्रपट पाहायचा ही त्यांची चाॅइस आहे आणि तो पाहण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. पुढे सनी(sunny leone) असं म्हणाली की, परंतु जे काही दाखवलं जातंय किंवा लिहिलं जातंय यावर कोणाही लगेच विश्वास ठेवला नाही पाहिजे.पुढे ती असंही म्हणाली की,” आपल्याला प्रत्तेक गोष्टीला सहमत होण्याची गरज नाहीए,जो कोणी लिहीतो किंवा प्रसिद्ध करतो. तो त्यांची चाॅइस आहे. ती असंही म्हणाली की,आपल्या मुलांनी कसा कंटेंट पाहायचा हे पालकांनी ठरवायला हवं. मुलांनाही त्यातील अंतर ठरवता यायला हवं.

शेवटी तिने सांगितलं की, “जर युवा हा चित्रपट पाहात असेल तर आपल्या परिवारात ,मित्रमैत्रिणींनी आणि आई-वडीलांनी यावर चर्चा करायला हवी. एक पाऊल पुढे टाकुन त्यांना सांगता यायला हवं की, ठीक आहे. तर हे पहा, हे सत्य आहे आणि हे काल्पनिक आहे. आपण आपल्या मुलांना हे समजवायला हवं की, वास्तव कसं असायला हवं आणि आपण एकमेकांप्रती दया दाखवली पाहीजे. ऍनिमल या चित्रपटात रणबीर कपूरसोबतंच रश्मिका मंदाना(rashmika mandanna), बाॅबी देवल(bobby deol), अनिल कपूर(Anil kapoor), शक्ती कपुर shakti kapooआणि प्रेम चोप्रा(prem chopra) हे प्रमुख भुमिकांमध्ये दिसले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

रणबीरच्या ऍनिमल चित्रपटावर सनी लियोनीची प्रतिक्रिया,”…प्रत्तेक गोष्टीला सहमत होण्याची नाही गरज”
Kriti Senon | अयोध्याला जाण्याच्या प्रश्नावर उत्तर देण्यास क्रिती सेननने केली टाळाटाळ; म्हणाली, ‘आता माझा गुरु…’

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा