अभिनेत्री अंकिता लोखंडेवर चढला हळदीचा रंग, विक्की जैनसोबत केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली असून, त्यांच्या लग्नाला आता फक्त काही तास उरले आहेत. लग्नाआधीच्या सर्व फंक्शन्समध्ये दोघे किती एन्जॉय करत आहेत, याचा अंदाज त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटोंवरून येऊ शकतो. नुकतेच या दोघांच्या साखरपुड्याचे आणि त्यांच्या मेहंदीचे फोटो समोर आले होते. जे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. आता दोघांच्या हळदीचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. जे पाहून दोघेही त्यांच्या हळदीचा सोहळा खूप एन्जॉय करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अंकिताने केला कहर 

अंकिता तिच्या हळदी समारंभात खूपच सुंदर दिसत होती. हातावर मेहंदी, कपाळावर छोटी लाल बिंदी, लाल रंगाचा शरारा, सोन्याचे दागिने आणि अंबाडा अशा पारंपरिक लूकमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसत होती. तिच्यावर हळदीचा रंगही छान चढला. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य स्पष्टपणे सांगत होते की, ती तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी खूप उत्सुक आहे.

मैत्रिणींनी लावली हळद 

या व्हिडिओमध्ये त्यांची जवळची मैत्रीण अमृता खानविलकर चेहऱ्यावर हळद लावताना दिसत आहे. तिच्या मैत्रिणींनी अंकितावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. हळदीनंतर अंकिताने तिच्या मैत्रिणींसोबत जबरदस्त पोझ दिली. अंकिताच्या चेहऱ्यावर वधू बनण्याचा नूर स्पष्ट दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

मित्रांनी विकी जैनला लावली हळदी

एकीकडे अंकिताला तिच्या मैत्रिणींनी हळद लावली, तर दुसरीकडे विकीला मित्रांनी हळद लावली. विकी पांढऱ्या कुर्त्यात देखणा दिसत होता. त्याने गळ्यात फुलांची माळ घातली होती आणि त्यांच्या भोवतीही फुलांनी सजावट केली होती. अंकिता आणि विकी यांच्या हळदीचे सर्व विधी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये केले जात आहेत.

विकीला खांद्यावर उचलून मित्रांनी केला डान्स

हळदी समारंभात दोघांच्याही आनंदाचे दर्शन घडत होते. हळदी समारंभानंतर त्यांच्या मित्रांनी विकी-अंकिता यांना खांद्यावर घेऊन ढोल-ताशांच्या तालावर जोरदार डान्स केला. यादरम्यान दोघेही बॉलिवूडच्या अनेक गाण्यांवर डान्स करताना दिसले. अंकिताची मैत्रिण अमृताने तिच्या सोशल मीडियावर सर्व व्हिडिओ शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

अंकिता-विकीच्या संगीत फंक्शनला पोहोचली कंगना रणौत

अभिनेत्री कंगना रणौत अंकिता आणि विकीच्या संगीतात पोहोचली. एथनिक लूकमध्ये कंगना खूपच सुंदर दिसत होती. अंकिताचा म्युझिक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये कंगना आणि अंकिता एकत्र बसलेले दिसत आहेत. दोघांमध्ये चांगले बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर गाजत आहेत. कंगनाने अंकिताच्या संगीत समारंभात लेहेंगा घातला होता, तिने तिच्या आउटफिटसोबत भारी दागिने घातले होते.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

१४ डिसेंबरला होणार लग्न 

अंकिता लोखंडे आणि विकी जैन मंगळवारी (१४ डिसेंबर) कायमचे एकत्र येणार आहेत. विकी आणि अंकिता गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांच्या प्रत्येक फंक्शनचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अशा परिस्थितीत अंकिताला नववधूच्या रुपात पाहण्यासाठी चाहतेही वाट पाहत आहेत.

हेही वाचा :

‘गोष्ट काळाइतकीच जुनी’, म्हणणाऱ्या मिथिला पालकरचा आयकॉनिक लूक पुन्हा एकदा चर्चेत

हातावरील टॅटूमागील गोष्ट सांगत, ‘जीव माझा गुंतला’ मधील ‘मल्हार’ने केला खास फोटो शेअर

सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग करणार एकत्र तिसरा चित्रपट, स्कॉटलंडमध्ये झाला शूटिंगला आरंभ

Latest Post