Sunday, July 20, 2025
Home बॉलीवूड सुशांतला आठवून भावूक झाली अंकिता; म्हणाली, ‘रोज नवनव्या कहाण्या… ट्रोलर्सनी उद्ध्वस्त केलं होतं आयुष्य’

सुशांतला आठवून भावूक झाली अंकिता; म्हणाली, ‘रोज नवनव्या कहाण्या… ट्रोलर्सनी उद्ध्वस्त केलं होतं आयुष्य’

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर कधी अंकिता लोखंडेला (Ankita Lokhande) सांत्वना दिल्या गेल्या, तर कधी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. यादरम्यान ती अनेकवेळा तुटली. अभिनेत्री नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर राहिली. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर तिचा पती आणि सुशांतचा मित्र विकी जैन याची काय प्रतिक्रिया होती, याचा खुलासा अभिनेत्रीने कधीच केला नाही. त्याचवेळी, आता अभिनेत्री पहिल्यांदाच यावर उघडपणे बोलली आहे.

एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री म्हणाली, “सुशांत आणि मी २०१६ मध्ये वेगळे झालो. दोन वर्षे सिंगल राहिल्यानंतर मी २०१८ मध्ये विकीला डेट करायला सुरुवात केली. पण, जेव्हा सुशांतचा मृत्यू झाला, तेव्हा ट्रोल्सने विकीवर हल्ला केला. ते म्हणू लागले की, ‘अंकिता ही सुशांतसाठी सर्वोत्तम होती आणि ती नेहमी सुशांतसोबत असायला हवी होती. सोशल मीडियाने विकीला मला सोडण्यास सांगितले, कारण मी सुशांतसाठी चांगला आहे.” (ankita lokhande says vicky jain told him this after ssr death)

अंकिता पुढे म्हणते, “यादरम्यान रोज वेगवेगळ्या कथा समोर येत होत्या आणि मीही सतत सुशांतबद्दल बोलत होते. पण विकी मला कधीच काही बोलला नाही किंवा त्याने कधीच काही विचारलेही नाही. याउलट, विकीसोबतच त्याचे कुटुंबही माझ्यासोबत होते.”

अभिनेत्री म्हणते, “जर दुसरा मुलगा असता, तर तो मला सोडून गेला असता. पण विकी नाही गेला. तो माझा कमकुवतपणा नव्हे, तर माझी ताकद बनला. आम्ही दोघेही शॉकमध्ये होतो आणि ट्रोलमुळे आमचे आयुष्य अधिक कठीण झाले. जेव्हा सुशांतचा मृत्यू झाला आणि मी त्याच्याबद्दल बोलू लागले, मी सतत गोंधळले होते की, मी बरोबर आहे की नाही? सहा महिने सुशांत आणि माझ्या भूतकाळातील नवनवीन गोष्टी समोर आणल्या जात होत्या. मी सुशांतची बाजू घेतली आणि विकी माझ्यासोबत असल्यामुळे मी ते करू शकले.”

दरम्यान अंकिता आणि सुशांतची पहिली भेट ‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या सेटवर झाली. त्यानंतर दोघे प्रेमात पडले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा