×

SSR | अंकिता लोखंडेने ‘असे’ काय म्हटले? ज्यामुळे भडकले सुशांत सिंग राजपूतचे चाहते

टेलिव्हिजनवर ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत आपल्या अभिनयाची जादू दाखवून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) होय. अंकिता आणि तिचा पती विकी जैन यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत ज्यांनी अंकिताला पडद्यावर पाहिले आहे, त्यांना आता तिचा नवरा विकीही पडद्यावर पाहायला मिळणार आहे. होय, विकी लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या शोचा प्रोमो शेअर करून अंकिताने कॅमेराच्या दुनियेत विकीचे स्वागत केले. ‘स्मार्ट जोडी’ असे या शोचे नाव आहे.

सध्या अंकिता तिच्या नवीन टीव्ही शो ‘स्मार्ट जोडी’मुळे चर्चेत आहे. दरम्यान, शोचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये अंकिताने पती विक्कीबद्दल काहीतरी सांगितले आहे. ज्यामुळे दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे (Sushant Singh Rajput) चाहते संतप्त झाले आहेत.

यामुळे संतापले सुशांतचे चाहते
प्रोमोमध्ये अंकिता लोखंडे सर्वांसमोर पती विकी जैनचे कौतूक करत आहे. यादरम्यान ती असे काही बोलते जे सुशांतच्या चाहत्यांना आवडले नाही. व्हिडिओमध्ये अंकिता म्हणते की, “प्रत्येक मुलीला असा जोडीदार असावा जो तुम्हाला प्रत्येक चांगल्या-वाईट काळात साथ देईल. जेव्हा मला विकीची खरोखर गरज होती तेव्हा तो माझ्यासोबत आहे, हे त्याने सिद्ध केले आहे. विकीमुळेच मी प्रेम समजून घेऊ शकले. खरे सांगायचे तर विकीसारखे प्रेम माझ्यावर कोणीही केले नाही.”

चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया 

व्हिडिओवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, “सुशांत भाईनेही नाही केले?” दुसर्‍याने लिहिले की, “माफ करा पण सुशांत भाईचेही तुझ्यावर खूप प्रेम होते पण तू ते पूर्ण केले नाहीस.” आणखी एकाने कमेंट केली की, “जेव्हा तू सुशांतसोबत होतीस तेव्हा तू म्हणायची की, तुला सुशांतसारखा जोडीदार सापडणार नाही आणि जेव्हा तुला विकी सापडला तेव्हा तू सुशांतच्या प्रेमाची तुलना विकीशी करत आहेस.” त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की, “अंकिता जी तुम्ही आत्ताच का म्हणालात की, विकीसारखं कोणीच प्रेम करू शकत नाही पण सुशांतही तुमच्यावर खूप प्रेम करतो.”

अंकिताचा पती ‘या’ शोमधून करतोय पदार्पण
मात्र, काही लोकांनी अंकिता आणि विकीचे कौतुकही केले आहे. अनेकांनी सांगितले की, विकीने अंकिताला नेहमीच पाठिंबा दिला आहे. जून २०२० मध्ये सुशांत सिंग राजपूतचे निधन झाले. अंकिता आणि सुशांत अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. यानंतर अंकिताने बिझनेसमॅन विकी जैनला डेट करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे ‘स्मार्ट जोडी’ हा शो या आठवड्यापासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये अंकिता-विकी व्यतिरिक्त अनेक सेलिब्रिटी कपल्स दिसणार आहेत.

हेही वाचा :

 

Latest Post