मनोरंजनविश्वात यावर्षी लग्नांचा बहार आला आहे. टीव्ही आणि बॉलिवूड विश्वातील अनेक जोड्या लग्नाच्या बेडीत अडकताना दिसत आहे. २०२१ च्या जानेवारी महिन्यात वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नापासून सुरू झालेल्या कलाकारांच्या लग्नाचा सिलसिला आता डिसेंबर महिन्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. मधल्या काळात कोरोनामुळे बंद असलेले लग्न आता पुन्हा सुरू झाले आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नानंतर आता बॉलिवूडमध्ये कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर टेलिव्हिजन विश्वात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू झाली आहे.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सुशांतसिंग सोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताने विकीला डेट कार्याला सुरुवात केली. मागील बरीच काळापासून अंकिता आणि विकी यांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. मधल्या काळात त्यांनी लग्न केल्याचे देखील सांगितले जात होते. मात्र आता हे दोघे खरोखरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अंकिता नेहमीच विकिसोबतचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते. त्यांची जोडी फॅन्सला खूप आवडते. मिळणाऱ्या माहिती नुसार अंकिता आणि विकी यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार अंकिता आणि विकी येणारी १४ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाचे सर्व फंक्शन थाटात पार पडणार असून, सर्व जवळच्या लोकांना आणि मित्रपरिवाराला लग्नाचे आमंत्रण देण्यात आले आहे. माहितीनुसार १२ डिसेंबरला अंकिताच्या मेहेंदीचे फंक्शन होणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी रिंग सेरेमनी होणार आहे. पुढे १४ ला सकाळी विधिवत त्यांचे लग्न पार पडेल आणि संध्याकाळी त्यांच्या इंडस्ट्रीमधील मित्रांसाठी रिसेप्शन आयोजित केले जाणार आहे.
अंकिताने आणि तिच्या आईने मिळून सर्व फंक्शनसाठी थीम ठरवली आहे. हळदीच्या दिवशी पिवळा रंग, मेहेंदीच्या दिवशी ब्राईड पॉप आणि संगीतला इंडो वेस्टर्न अशी थीम असणार आहे. काही दिवसांपूर्वीच अंकिताने तिच्या मैत्रिणींसोबत तिची बॅचलर पार्टी देखील साजरी केली. या पार्टीला इंडस्ट्रीमधील तिच्या अनेक मैत्रिणींनी हजेरी लावली होती. सोबतच या पार्टीचे भरपूर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती
-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत
-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा