टिव्ही विश्वातील लोकप्रिय चेहरा अंकिता लोखंडे हिला ओळखत नाही असे कोणीच नाही. अंकिता यापूर्वी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर अंकिता सतत चर्चेत राहिली. ‘पवित्र रिश्ता’ या मालिके पासून अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रचंड प्रसिद्ध झाली आहे. त्याचबरोबर अंकिताने आता बॉलिवूडमध्येही एन्ट्री केली आहे. याशिवाय ती तिच्या पर्सनल लाईफमुळे अनेकदा चर्चेत असते.
अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) दीर्घकाळ डेट केल्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये बिझनेसमन विकी जैनशी (Vicky Jain) विवाह बंधनात अडकली. या दोघांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण होत असताना या जोडप्याला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. अलीकडे अभिनेत्री अंकिताचे फोटो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.अंकिताच काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
व्हायरल होत असलेसल्या फोटोंमध्ये अभिनेत्री अंकिताने अतिशय सुंदर साडी घातली असून त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. खरंतर अंकिताने परिधान केलेली साडी बरीच सैल आहे. इतकंच नाही तर तिने पोटासमोर हात ठेवत आहे. यादरम्यान चाहत्यांचे लक्ष तिच्या पोटाकडे लागले आहे.
या फोटोशूटमध्येच नाही तर इतरही अनेक फोटोंमध्ये अंकिताचा बेबी बंप दिसत आहे. अंकिताकडे पाहून असे दिसते की, तिने तिचा बेबी बंप लपवला आहे. चाहत्यांना आता या गोड बातमीची उसुक्ता लागली आहे. मात्र, अंकिता किंवा तिचा पती विकी किंवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने याला दुजोरा दिलेला नाही. मात्र, हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अंकिता लोखंडेच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, ‘पवित्र रिश्ता’मध्ये अर्चनाची महत्त्वाच्या भूमिका साकारल्यानंतर अंकिता आता ‘द लास्ट कॉफी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची कथा रेहान आणि इरम यांच्या घटस्फोटापूर्वी एका कॉफीवर झालेल्या शेवटच्या भेटीभोवती फिरते. (Ankita Lokhande’s baby bump photos go viral)