Saturday, February 22, 2025
Home बॉलीवूड ठरलं तर! अंकिता लोखंडेने व्यक्त केली लग्नाविषयीची भावना, ‘या’ तारखेला घेणार सात फेरे

ठरलं तर! अंकिता लोखंडेने व्यक्त केली लग्नाविषयीची भावना, ‘या’ तारखेला घेणार सात फेरे

सिनेसृष्टीमध्ये सध्या विकी कौशल – कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर – आलिया भट्ट हे कलाकार आणि त्यांच्या लग्नाच्या वृत्तांना उधाण आलेले दिसत आहे. अशात या यादीमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडेचे नाव देखील सामील झाले आहे. अंकिताने लग्नाविषयी तिच्या मनातील भावना सर्वांना सांगितली आहे. त्यामुळे आता ती केव्हा लग्न करणार असे प्रश्न चाहते तिला विचारत आहेत.

अंकिताने नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ती बॉयफ्रेंड विक्की जैन बरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. त्यामुळे तिथे तिला लग्नाविषयी तिचे मत विचारण्यात आले होते. तेव्हा ती उत्तर देत म्हणाली की, “लग्न आणि प्रेम या दोन्ही तत्वांवर माझा विश्वास आहे. लग्नाबद्दल माझ्या मनात नेहमीच उत्सुकता आहे, कारण यामध्ये दोन व्यक्ती एकत्र राहून पुढे संसार चालवणार असतात.” (ankita lokhandes statement surfaced amid rumors of marriage said i would be happy to be called someones wife)

पुढे भारतीय संस्कृतीचा उल्लेख करत ती म्हणाली की, “लग्न हे फक्त एका मुलाचे आणि एका मुलीचे होत नाही, तर यामध्ये दोन कुटुंब जोडली जातात. भारतीय संस्कृतीमध्ये असेच आहे. मला हे फार आवडते आणि जर मला त्याची संधी मिळाली तर नक्कीच मी तसे करेल.”

या तारखेला होऊ शकते लग्न
अंकिताला ती डिसेंबरमध्ये लग्न करणार आहे का? असा प्रश्न एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. तेव्हा तिने सरळ उत्तर न देता सांगितले की, “एक ना एक दिवस मी लग्न करणारच आहे. मला पत्नी होण्याची आणि संसार सुरू करण्याची खूप आवड आहे.” तिने दिलेल्या या उत्तरामुळे ती डिसेंबर १२, १३ किंवा १४ या तारखांमध्येच सात फेरे घेताना दिसेल. अशी चर्चा सुरू आहे. मात्र यावर अद्याप तिने स्पष्ट कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

साध्या पद्धतीने करणार लग्न
अनेक वृत्तांमध्ये असे देखील सांगितले आहे की, अंकिता बॉलिवूड कलाकारांप्रमाणे डेस्टिनेशन लग्न करणे टाळणार आहे. ती लग्नासाठी मुंबईमधीलच एक पंचतारांकित हॉटेलच्या शोधत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सलमान अन् राणीने ‘तेरी चुनरिया’वर केला जबरदस्त डान्स, चाहत्यांच्या आठवणी झाल्या ताज्या

-कंगना रणौतला पुरस्कार, पण तुमच्या नावाचा विचार का नाही झाला? पाहा या प्रश्नावर काय म्हणाला सोनू सूद

-मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी

हे देखील वाचा