Saturday, December 21, 2024
[aioseo_breadcrumbs]

हा आहे कोकण हार्टेड गर्लचा भावी नवरा, दसऱ्याच्या मुहूर्तावर अंकिताने दाखवला चेहरा

बिग बॉस मराठी 5 ची स्पर्धक अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) हिने बिग बॉसमध्ये असतानाच तिचे लग्न ठरले असल्याची माहिती दिली. आणि तेव्हापासूनच खूपच भावी नवरा कोण असणार आहे? अशी सगळ्यांमध्ये चर्च चालू होती. तिने तिच्या सोशल मीडियावर देखील पोस्ट करून तिचे लग्न ठरले आहे असे सांगितले होते. परंतु तिच्या बॉयफ्रेंडचे नाव तसेच चेहरा देखील सांगितला दाखवला नव्हता. अशातच तिने आज म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा सर्वांना दाखवलेला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून तिने त्यांच्या नात्याची अधिकृत पृष्टी केलेली आहे.

अंकिताच्या बॉयफ्रेंडचे नाव कुणाल भगत असे आहे. कुणाल भगत हा एक प्रसिद्ध संगीतकार आहेत. आणि अनेक मालिका आणि चित्रपटाला संगीत दिलेले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अंकिता आणि कुणाला रिलेशनशिपमध्ये आहेत. कुणालच्या सोशल मीडियावर अंकिता सोबतचे काही फोटो पाहायला मिळतात. सोशल मीडियाव अंकिताने त्यांच्या नात्याची गोष्टी केल्यानंतर अनेक कलाकार आणि त्यांचे चाहते सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा देत आहेत. आणि त्यांचे अभिनंदन देखील करत आहेत.

अंकिताने बिग बॉस 5 मध्ये चांगले सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तिच्या मालवणी भाषेने देखील सगळेजण तिच्याकडे आकर्षित झाले होते. परंतु येत्या बाहेर आल्यानंतर ती येते फेब्रुवारी महिन्यापर्यंत लग्न करणार असल्याचे देखील सांगितलेले आहे. अंकिताने सोशल मीडियावर पोस्ट करून सूर जूळले असे कॅप्शन देत कुणाल सोबतचा फोटो शेअर केलेला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

निया शर्मा बिग बॉस 18 चा भाग का बनली नाही? अभिनेत्रीने तोडले मौन
मल्लिका शेरावतने बॉलीवूडवर केले गंभीर आरोप; म्हणाली, ‘इथे ‘चमचगिरी’ सुरू आहे.

हे देखील वाचा