बिगबाॅस 17 (Big Boss 17) च्या अंतिम भागाला अगदी काहीच दिवस उरले आहेत. 28 जानेवारीला बिगबाॅस 17 चा ग्रँड फिनाले आहे. परंतू अशातच एक वाद मोठं वळण घेताना आपल्याला दिसत आहे. तो वाद म्हणजे विक्की आणि अंकिताचं चप्पल प्रकरण. विक्की आणि अंकिताची जोडी बिगबाॅस 17 च्या अगदी पहिल्या एपिसोडपासुन चर्चेत आहे. परंतू मध्यंतरी ‘फॅमिली विक’मध्ये विक्कीची आई बिगबाॅसच्या घरात आली आणि या चर्चेने वादाचं रूप घेतले. विक्कीच्या आईच्या त्या भाष्यावर अनेक सेलिब्रिटींनीही त्यांची प्रतिक्रिया नोंदवत, अंकिताला पाठिंबा दिला. पण आता मात्र बिगबाॅसच्या घरात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. ती चर्चा आहे ‘विकेंड का वार’ एपिसोडची.
या ‘विकेंड का वार’ एपिसोडमध्ये अंकिता आणि विक्कीचं सिरीयस डिस्कशन झालं. या चर्चेत नाराज झालेल्या अंकिताने विक्कीच्या वडिलांनी तिच्या आईवर कसे शाब्दिक वार केले हे सांगितले. अंकिताने विक्कीवर ‘चप्पल फेकल्यानंतर’ विकीच्या वडिलांनी अंकिताची आई वंदना लोखंडे यांना फोन केला होता. अंकिताने त्या दोघांच्या पालकांमध्ये झालेल्या संभाषणाबद्दल खुलासा केला आणि ही ‘विकेंड का वार’ एपिसोडमधली ‘फॅमिली ड्रामा’ ची क्लिप X (आधीचे ट्विटर) वर वायरल होत आहे.
अंकिताचा ‘चप्पल फेकलेला’ विडीयो सोशल मिडीयावर वायरल झाल्यानंतर. विक्कीच्या(vicky Jain) वडिलांनी अंकिताच्या आईला विचारले, तुम्हीही तुमच्या स्वर्गवासी पती शशिकांत लोखंडेंना असंच चप्पलने मारत होता का? शशिकांत लोखंडे हे अंकिताचे वडील असून. ऑगस्ट 2023 मध्ये त्यांचे निधन झाले. पुढे अंकिताने असंही सांगितले की, ते फक्त इतक्यावर न थांबता, पुढे “लायकी काय आहे तुमची ” असंही आईला म्हणाले
परंतु मी आईंना (विक्कीच्या आईला) नम्रपणे सांगितले की, माझ्या वडिलांचे काही दिवसांपुर्वीच निधन झाले आहे, त्यामुळे माझी आई एकटी आहे. मी त्यांना झालेल्याप्रकाराबद्दल माफी देखील मागीतली.
X वर नोंदवल्या गेल्या अनेक प्रतिक्रिया
फॅनपेजने ‘विकेंड का वार’ एपिसोडमधली ‘फॅमिली ड्रामा’चा विडीयो X या प्रसारमाध्यमावर टाकून कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ” ते फक्त इतकंच म्हणाले नाहीत की, तुम्हीही तुमच्या पतीला असंच मारत होता का? तर ते असंही म्हणले की,लायकी काय आहे तुमची, त्याचसोबत अनेक कठोर गोष्टी ते बोलले. विक्कीच्या क्रुर फॅमिली ड्रामाला कंटाळल्याचेही अनेक यूजरनी या ट्विटवर रिऍक्ट केले आहे. तर काही यूजरनी अंकितावर(Ankita lokhande) शंका घेत असेही मत व्यक्त केले की, ती जे बोलत होती ते खोटंही असु शकतं. कारण ती बोलत होती त्याचे रेफरंस बिगबाॅसमध्ये दाखवलेले नाहीत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘क्रॅक’ चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज, विद्युत जामवाल आणि नोरा फतेही यांच्या केमिस्ट्रीने वेधले लक्ष
‘मी मोदींचा टीकाकार असल्यामुळे अनेक पक्ष मला उमेदवार बनवू इच्छितात’, प्रकाश राज यांचा मोठा दावा