Tuesday, March 5, 2024

‘क्रॅक’ चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज, विद्युत जामवाल आणि नोरा फतेही यांच्या केमिस्ट्रीने वेधले लक्ष

विद्युत जामवाल,(Vidyut Jammwal) नोरा फतेही (Nora Fatehi) आणि अर्जुन रामपाल(Arjun Rampal) अशी स्टार कास्ट असलेला,अदित्य दत्त दिगदर्शित ‘क्रॅक-जीतेगा तो जिएगा’,(Crakk – Jeethegaa Toh Jiyegaa) २०२४मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विद्युत जामवाल आणि नोरा फतेही यांची क्रॅक-जीतेगा तो जिएगा या बहुचर्चीत फिल्मचा टीझर आधीच रिलीज झाला होता. आता या फिल्मचे पहिले गाणे दिल झूम हे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.यागाण्यात विद्युत जामवाल आणि नोरा फतेहीची चांगली केमिसट्री दिसते आहे.गाण्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे.

अली जफरचे गाणे
पाकिस्तानी गायक अली जफरने (Ali Zafar) हे गाणे लिहले आणि कंपोज केले आहे. श्रेया घोषाल आणि विशाल मिश्रायांनी गायले आहे तर, तनिष्क बागची आणि गुरप्रित सैनीयांनी गाणे रिक्रिएट केले आहे.

२३ फेब्रुवारीला होणार रिलीज
अदित्य दत्त दिगदर्शित क्रॅक-जीतेगा तो जिएगाही फिल्म २३ फेब्रुवारी २०२४ला रिलीज होणार आहे. विद्युत जामवाल आणि अब्बास सैयद्द सोबत फिल्म निर्मिती सुद्धा केली आहे. विद्युत जामवाल, नोरा फतेही, एमी जैक्सन(Amy Jackson) आणि अर्जुन रामपालहे प्रमुख भुमिकेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘मी मोदींचा टीकाकार असल्यामुळे अनेक पक्ष मला उमेदवार बनवू इच्छितात’, प्रकाश राज यांचा मोठा दाव
अॅनिमलच्या सह-निर्मात्याने ठोठावला दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा, चित्रपटाच्या ओटीटी रिलीजवर केली बंदी घालण्याची मागणी

हे देखील वाचा