Wednesday, July 16, 2025
Home बॉलीवूड ‘द कश्मीर फाईल्स’बद्दल महत्वाची बातमी, विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवरून दिली माहिती

‘द कश्मीर फाईल्स’बद्दल महत्वाची बातमी, विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवरून दिली माहिती

भारतीय बॉक्स ऑफिसवर आग लावल्यानंतर ‘द काश्मीर फाइल्स’ आता यूएईकडे कूच करत आहे. काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) खुलासा केला होता की, यूएईमध्ये त्याच्या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे, परंतु त्यामागील कारण माहित नव्हते. दिग्दर्शकाने आता ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये खुलासा केला आहे की, चित्रपटावरील बंदी अखेर उठवण्यात आली असून, ‘द काश्मीर फाइल्स’ यूएईमध्ये ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

एका ट्विटमध्ये विवेक अग्निहोत्री म्हणाले की, “मोठा विजय: शेवटी, संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सेन्सॉरची मंजुरी. रेट केलेले १५+ कोणत्याही कपातीशिवाय उत्तीर्ण झाले. हा चित्रपट ७ एप्रिलला (गुरुवार) प्रदर्शित होत आहे. आता सिंगापूर.” त्याचवेळी अनुपम खेर यांनीही ही बातमीचा आनंद साजरा केला. अनुपम खेर (Anupam Kher) यांनी दिग्दर्शकाचे ट्वीट रिट्वीट करत लिहिले, “हर हर महादेव.”

‘या’ देशांमध्ये प्रदर्शनावर घालण्यात आली होती बंदी

या महिन्याच्या सुरुवातीला विवेकने आपल्या एका मुलाखतीत ‘द काश्मीर फाइल्स’वर काही देशांमध्ये बंदी घालण्याचा उल्लेख केला होता. तो म्हणाला होता की, “संयुक्त अरब अमिरातीमध्ये या चित्रपटावर बंदी आहे.” तो म्हणाला की, “आम्ही हा चित्रपट दाखवू शकत नाही. सिंगापूर आणि कतारमध्येही तेच आहे.”

ब्रिटिश संसदेचे आमंत्रण

दरम्यान, ब्रिटीश संसदेने काश्मिरी पंडितांच्या दुरवस्थेबद्दल बोलण्यासाठी विवेक आणि त्याची पत्नी पल्लवी जोशी (ज्यांनी या चित्रपटातही भूमिका केली होती) यांना आमंत्रित केल्याचे वृत्त समोर आले आहे. माध्यमांशी बोलताना दिग्दर्शकाने या वृत्ताला दुजोरा दिला.

विवेक आपल्या पत्नीसोबत ब्रिटीश संसदेत भेटणार 

विवेक म्हणाला की, “बरोबर आहे, माझी पत्नी पल्लवी आणि मला ब्रिटीश संसदेत बोलावले आहे. पुढच्या महिन्यात आपण तिथे जाऊ. काश्मीर पंडितांच्या नरसंहाराचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याच्या स्पष्ट उद्देशाने ‘द काश्मीर फाइल्स’ची निर्मिती करण्यात आली. आम्ही तिथे पोहोचलो याचा मला आनंद आहे.”

बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचा धुमाकूळ आहे सुरू

‘द काश्मीर फाइल्स’ने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर उत्तम कलेक्शन नोंदवले आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट केले की, ‘#TheKashmirFiles (आठवडा ३) शुक्रवार ४.५० कोटी, शनी ७.६० कोटी, रवी ८.७५ कोटी, सोमवार ३.१० कोटी, मंगळ २.७५ कोटी एकूण २४३.०३ कोटी सर्व वेळ ब्लॉकबस्टर.” ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी बुधवारी (३० मार्च) ट्वीटरवर खुलासा केला की, द काश्मीर फाइल्स २५० कोटी रुपयांच्या आकड्याकडे वाटचाल करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा