गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खान अभिनित ‘अंतिम द फायनल ट्रूथ’ या चित्रपटाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत आहे. अशात या चित्रपटामध्ये बॉलिवूडच्या बजरंगी भाईजान पेक्षा अभिनेता आयुष शर्माच्या अभिनयाची आणि परिवर्तनाची चर्चा रंगलेली दिसत आहे.
आयुषने ‘लवरात्री’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्याने एका प्रेमी तरुणाची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता ‘अंतिम द फायनल ट्रूथ’ मधील त्याचे पात्र ‘लवरात्री’ पेक्षा अगदी विरुद्ध आहे. यामध्ये त्याने घेतलेली मेहनत आणि त्याचे परिवर्तन यावर कलाकरांच्या प्रतिक्रिया असलेला बीटीएस व्हिडिओ नुकताच सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. (antim ayush sharma transformation impressed salman khan see bts video)
या व्हिडिओमध्ये सलमान खान आयुषचे कौतुक करत त्याच्याबद्दल बोलत आहे की, “मी चकित झालो आहे. लवरात्रीनंतर आता अंतिमसाठी आयुषने केलेले बदल खरोखरच कौतुकस्पद आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे अनेक जण कौतुक करताना नक्की दिसतील.”
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी देखील आयुषबद्दल सांगितले आहे की, “आयुषने शारीरिक परिवर्तनासाठी खूप मेहनत घेतली आहे. मला चित्रपटामध्ये अगदी कठोर स्वभाव असलेला मुलगा हवा होता. या मुलामध्ये तशी धमक आणि जिद्द दिसते. काय करायला हवे आणि काय नाही हे त्याला समजते. चित्रपटात त्याने दमदार अभिनय केला आहे. मला नाही वाटत राहुलिया त्याच्या पेक्षा दुसरा कोणता कलाकार अधिक चांगला साकारू शकतो.”
या व्हिडिओमध्ये आयुष देखील त्याच्या पात्राविषयी बोलताना दिसत आहे. तो म्हणाला आहे की, “अंतिम हा एक असा चित्रपट आहे ज्याने मला खूप काही शिकवले आहे. मला आणि माझ्यातील अभिनयाला यामुळे विकसित करण्यात खूप मदत झाली आहे. धन्यवाद महेश सर आणि सलमान दादा, माझ्यासाठी हा खूप सुंदर अनुभव आहे. जेव्हा शूटिंग सुरू झाले तेव्हा मला नव्हते वाटले की, मी राहुलिया हे पात्र उत्तम साकारू शकेल. आता शूटिंग संपले आहे, तर मला समजत नाही की, मी राहुलियापासून कसा दूर जाऊ.”
‘अंतिम द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट २६ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत असला तरी आयुष त्याला टक्कर देईल अशी देखील चर्चा होत आहे. तसेच चित्रपटामध्ये महिमा मकवाना मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सलमान अन् राणीने ‘तेरी चुनरिया’वर केला जबरदस्त डान्स, चाहत्यांच्या आठवणी झाल्या ताज्या
-कंगना रणौतला पुरस्कार, पण तुमच्या नावाचा विचार का नाही झाला? पाहा या प्रश्नावर काय म्हणाला सोनू सूद
-मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी