Monday, June 24, 2024

नवरदेवाने लग्नाच्या शुभ प्रसंगी का आणि कशासाठी उचलेले ‘हे’ टोकाचे पाऊल; ‘अंतरपाट’ १० जून पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार

महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘कलर्स मराठी’चे प्रोग्रामिंग हेड म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर रसिकांच्या भेटीला नवनवीन मालिका येतच आहेत.

‘अबीर गुलाल’ या नव्या मालिकेसोबत आता ‘अंतरपाट’ ही नवीन मालिका १० जून पासून संध्याकाळी ७:३० वाजता रसिकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांआधी या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून, त्यात हळदीचा समारंभ सुरू असल्याचे दिसत होते. लव्ह मॅरेजच्या काळात अरेन्ज मॅरेज करणाऱ्या गौतमीला परफेक्ट जोडीदार मिळाल्याने ती अतिशय आनंदी आहे. गौतमीला आपल्या जोडीदारासोबत प्रत्येक स्वप्नं पूर्ण करायचे आहे. गौतमीला वाटतेय की, क्षितिज हा सर्वोत्तम आणि परिपूर्ण असा नवरा आहे, जसा तिला हवा होता, अगदी तसा.

आता या मालिकेचा अजून एक नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात तुम्ही पाहू शकता की, उल्हासित, आनंदी वातावरण, लग्नाची लगबग, सजलेला मंडप, पाहुण्यांचा सगळीकडे वावर दिसत आहे. गौतमी मंडपाकडे चालत येत असताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात आहे. तसेच मंडपात क्षितिजच्या मनात भलतीच घालमेल सुरु असल्याचे देखील दिसत आहे. सनई चौघडण्याच्या सुरामध्ये दोघांनी ही एकमेकांना वरमाळा घातल्या. सगळीकडे आनंदाचे वातावरण असतानाच,क्षितिज गौतमीला बोलतो की, मी एक तुझ्याकडे गोष्ट मागू का? गौतमी हसून म्हणते हो आणि मग क्षितिज तिच्या कडून घटस्फोट मागतो. काय असेल क्षितीजच्या मनात? लग्नाच्या शुभ प्रसंगी का आणि कशासाठी असे टोकाचे पाऊल उचलले असेल? काय लिहिले आहे गौतमीच्या नशिबात? नशिबाने मांडला लग्नाचा घाट, पण नियतीने धरला दुराव्याचा अंतरपाट!

या मालिकेचा प्रोमो तुम्ही कलर्स मराठीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर देखील पाहू शकता. तसेच ‘अंतरपाट’ या मालिकेत अशोक ढगे, रश्मी अनपट, रेशम टिपणीस या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही गोष्ट नेमकी काय असणार, याची प्रेक्षकांना खूपच उत्सुकता लागली आहे. ‘अंतरपाट’ ही मालिका १० जून पासून संध्याकाळी ७: ३० वाजता कलर्स मराठीवर आणि #JioCinema वर रसिकांना भेटायला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

नॅन्सी त्यागीने व्यक्त केली तिची सर्वात मोठी इच्छा, किंग खानसाठी डिसाइन करायचा आहे खास ड्रेस
राहुल गांधींनी ‘कान्स’ विजेत्यांचे केले अभिनंदन; सोशल मीडियावर कौतुक करताना म्हणाले…

हे देखील वाचा