Tuesday, May 28, 2024

भारती सिंगला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज, शस्त्रक्रियेनंतर दाखवला पोटातून निघालेला स्टोन

भारती सिंग (Bharati Singh) ही देशातील प्रसिद्ध विनोदी कलाकारांपैकी एक आहे. ती तिच्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंग आणि विनोदांसाठी ओळखली जाते. तिच्यातील टॅलेंटमुळे त्याचे लाखो चाहते आहेत. अलीकडेच तिच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. कॉमेडियन भारती सिंगला पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. रुग्णालयात दाखल असताना आपल्या मुलाच्या ‘गोला’ची आठवण करून ती भावूक झाली होती.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिच्या किडनीमध्ये ‘स्टोन’ असल्याचा खुलासा केला होता, त्यामुळे तिला पोटात असह्य वेदना होत होत्या. अभिनेत्रीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ‘स्टोन’ यशस्वीरित्या काढण्यात आला आहे ३ ते ४ दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर भारतीला आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तिच्या शस्त्रक्रियेनंतर भारती सिंगने एका व्हिडिओद्वारे तिच्या किडनीतून काढलेला स्टोन दाखवला. तिने खूप चेष्टेने शिव्या दिल्या. एका छोट्याशा दगडाने तिला= किती त्रास झाला हे सांगितले. शस्त्रक्रियेला ती घाबरत नसल्याचेही भारतीने यावेळी सांगितले. तिच्यासाठी सर्वात कठीण गोष्ट म्हणजे तिचा मुलगा गोलापासून दूर राहणे, कारण मुलांना रुग्णालयात परवानगी नव्हती, त्यामुळे ती आपल्या मुलाला भेटू शकली नाही.

जेव्हा भारतीची शस्त्रक्रिया झाली आणि तिला समजले की ती आता बरी आहे आणि लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे, तेव्हा तिने तिच्या ‘गोला’ मुलाला रुग्णालयात भेटायला बोलावले. आपल्या मुलाला पाहून तिला खूप आनंद झाला होता. आता अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ती तिच्या घरी पोहोचली आहे. अभिनेत्रीला पाहून घरातील सदस्य खूप आनंदी झाले.

भारती सिंग डान्स दिवाने होस्ट करते. डान्स दिवानेच्या शूटिंगदरम्यान त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुटिंग संपल्यावर तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं असं तिला वाटलं होतं, पण त्रास वाढल्याने तिला शो मध्येच सोडून हॉस्पिटलमध्ये जावं लागलं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस अजूनही पूर्ण बरा होण्याच्या प्रक्रियेत; म्हणाला, ‘अजून सहा महिने…’
Satish Joshi Death | दुःखद !! स्टेजवर अभिनय करतानाच जेष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन

हे देखील वाचा