अभिनेते अनुपम खेर हे इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहेत. हे कमावण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. अनुपम यांचा अभिनय देखील चाहत्यांमध्ये बराच चर्चेत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की अनुपम मुंबईत भाड्याच्या घरात राहतात. अनुपम खेर यांनी नुकताच खुलासा केला की, ते मुंबईत ज्या फ्लॅटमध्ये राहतात, तो फ्लॅट त्यांचा स्वतःचा नाही. हे भाड्याचे घर आहे. आजपर्यंत त्यांनी फक्त एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे, ती पण शिमलामध्ये आई दुलारीसाठी.
मुंबईत नाहीये अनुपम यांचे स्वतःचे घर
माध्यमातील वृत्तानुसार, अनुपम एका मुलाखतीत म्हणाले की, “मुंबईत माझे स्वतःचे घरही नाही. मी भाड्याच्या घरात राहतो. ४-५ वर्षांपूर्वी मी ठरवले होते की, मी कोणतीही मालमत्ता खरेदी करणार नाही. मी ४ वर्षांपूर्वी फक्त माझ्या आईसाठी शिमलामध्ये घर विकत घेतले आहे. (anupam kher lives in a rented apartment in mumbai)
अनुपम यांची आई अनेक वर्षांपासून शिमलामध्ये भाड्याच्या घरात राहत आहे, म्हणून त्यांना स्वतःचे घर हवे होते. अनुपम त्यांच्या आईला काहीतरी खास देऊ इच्छित होते. म्हणून त्यांनी त्यांच्या आईसाठी एक खास घर विकत घेतले. अनुपम यांनी आई दुलारीच्या प्रतिक्रियेबद्दलही सांगितले. अनुपम यांची आई घर पाहिल्यानंतर म्हणाली, “तू वेडा आहेस का? मला नकोय एवढं मोठं घर.” त्यावेळी त्या अनुपम यांच्यावर चिडल्या होत्या.
या चित्रपटात झळकणार अनुपम
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अलीकडेच अनुपम यांनी त्यांच्या ५१९ वा चित्रपट ‘शिव शास्त्री बडबोला’चे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत नीना गुप्ताही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा अमेरिकेतील एका छोट्या शहरात राहणाऱ्या भारतीयांचे अस्तित्व सांगते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’
-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…
-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत