Thursday, April 18, 2024

‘लालसिंग चड्ढा फार चांगला सिनेमा नव्हता’ म्हणत अनुपम खेर यांनी बॉयकॉट बॉलिवूडवर केले भाष्य

अभिनेते अनुपम खेर यांना त्यांच्या प्रभावी अभिनयासाठी आणि त्यांच्या उत्तम विचारांसाठी ओळखले जाते. एक उत्तम अभिनेते असण्यासोबतच ते उत्कृष्ट विचारवंत आणि व्याख्याते देखील आहे. आपले मतं, विचार स्पष्ट शब्दात व्यक्त करताना ते अजिबातच मागे पुढे पाहत नाही. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीमध्ये ‘बॉयकॉट बॉलिवूड’ या ट्रेंडवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी हा ट्रेंड संपवण्यासाठी एक उपाय देखील सांगितला.

अनुपम खेर यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितले, “मला वैयक्तिकरित्या असे वाटते की, या ट्रेंडमध्ये कोणत्याही सिनेमावर फरक पडत नाही. जर तुमचा सिनेमा चांगला आहे, तर तो चालणार मात्र जर सिनेमा खराब आहे तर त्यावर त्याचा परिणाम नक्की दिसणार, मात्र तो ट्रेंड आहे म्हणून नाही. सर्वाना अभिव्यक्ती स्वतंत्र आहे. जर एखाद्या कलाकाराला, किंवा चित्रपटाशी संबंधित एखाद्या व्यक्तीला कोणत्या परिस्थितीबद्दल बोलण्याचा अधिकार आहे, तर त्यांना परिस्थितीतून जाण्याची हिंमत देखील असायला पाहिजे.”

पुढे लालसिंग चड्ढाबद्दल अनुपम खेर म्हणाले, “लाल सिंग चड्ढा हा काही फार चांगला सिनेमा नव्हता. जर तो खरंच इतका चांगला चित्रपट असता तर तो कोणत्याही परिस्थितीत हिट झालाच असता. आमिर खानचा पिके सिनेमा हिट झाला. हे सत्य सर्वांनी स्वीकारायला पाहिजे. मी बॉयकॉट ट्रेंडचे समर्थन करत नाही, पण आपण कोणालाही थांबवू शकत नाही. जर तुमचा चित्रपट चांगला असेल तर तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोच. उत्तमोत्तम चित्रपट करूनच या बॉयकॉट ट्रेंडवर आपण मात शकतो.”

दरम्यान अनुपम खेर लवकरच कंगना रणौतच्या इमर्जन्सी सिनेमात ते दिसणार असून, सोबतच अनुराग बसूच्या ‘मेट्रो इन दिनो’मध्ये देखील ते दिसणार आहे. नुकताच त्यांच्या आगामी आईबी71 सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘भारतात समस्या…मात्र दुबईत मी सुरक्षित’ जीवे मारण्याच्या धमक्यावर सलमान खानने सोडले मौन

पहिलाच चित्रपट ठरला हिट, तर पुढे तिन्ही खानसोबत काम करायची मिळवली तिने सुवर्णसंधी; वाचा अनुष्का शर्माचा यशस्वी जीवनप्रवास

हे देखील वाचा