Wednesday, April 17, 2024

अनुपम खेर यांनी लावली आपल्या मेकअप मॅनच्या मुलीच्या लग्नाला हजेरी, व्हिडिओ झाला व्हायरल

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे सध्या त्यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमामुळे प्रचंड गाजताना दिसत आहे. एकीकडे त्यांच्या सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत असून, दुसरीकडे त्यांच्या सिनेमातील भूमिकेचे आणि अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. अनुपम स्वतः काश्मीरी पंडित असल्याने त्यांनी ही भूमिका अतिशय प्रभावी आणि ताकदीने निभावली आहे. विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित या सिनेमात ९० च्या दशकात झालेल्या काश्मीरी पंडितांवरील अत्याचाराला दाखवण्यात आले आहे.

अतिशय मार्मिक पद्धतीने या चित्रपटात या संपूर्ण घटनेला दाखवण्यात आले आहे. आज भलेही सिनेमाला घेऊन देशात मोठ्या प्रमाणावर राजकारण चालू असले तरी सिनेमाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. यातच अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये ते एका कार्यक्रमात असून, त्यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

अनुपम खेर (Anupam Kher) यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत त्यांच्या मेकअप मॅनच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावली होती. सोशल मीडियावर तुफान सक्रिय असलेल्या अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या मेकअप मॅनच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावत त्यांना आशीर्वाद दिले आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “आज माझ्या २७ वर्षांपासून असलेल्या मेकअप आर्टिस्ट मंगेश देसाई यांच्या मुलीने मैथिलीने सत्येंद्रसोबत लग्न केले. मंगेश यांनी मी निभावल्या अनेक भूमिकांमधून त्याचे प्रेम देत त्याची कला लोकांसमोर मांडली. देव नेहमीच या जोडीवर त्यांचा आशीर्वाद देत राहो. खूप प्रेम आणि आशीर्वाद.”

अनुपम खेर यांच्या या पोस्टला नेटकऱ्यांचे अमाप प्रेम मिळत असून, त्यावर भरभरून कमेंट्स देखील येत आहे. नुकतेच अनुपम खेर यांनी त्यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाच्या टीमसोबत उत्तरप्रदेशच्या राज्यपाल असलेल्या आनंदीबेन पटेल यांची भेट घेतली. याचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा