‘मी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारतेय’ म्हणत पारुल चौहानने व्यक्त केल्या भावना

सोनी सब टिव्हिवरील लोकप्रिय कार्यक्रम धर्मयोद्धा गरुड सध्या सर्वत्र चर्चेत आहे. सध्या  हा कार्यक्रम सर्वत्र लोकप्रिय होत असून कार्यक्रमाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमात भूमिका साकारणाऱ्या पारुल चौहानच्या (Parul Chauhan) भूमिकेचेही सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमात पारुलने एक नकारात्मक भूमिका साकारली आहे ज्याने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. अलिकडेच आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना पारुलने अनेक खुलासे केले आहेत. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, प्रसिद्ध टिव्ही कलाकार पारुल चौहान सध्या तिच्या धर्मयोद्धा गरुड मालिकेतील भूमिकेने सर्वत्र चर्चेत आहे. याबद्दल बोलताना पारुल म्हणते की, “मी या कार्यक्रमासाठी खूपच उत्साहित आहे. सोनी बरोबर माझा हा पहिलाच कार्यक्रम आहे. तसेच ही माझ्या १६ वर्षाच्या अभिनय कारकिर्दितील पहिलीच नकारात्मक भूमिका आहे. या कार्यक्रमातून मी मोठ्या कालावधीनंतर पडद्यावर पदार्पण करणार आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमासाठी माझा सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणार आहे.” हा कार्यक्रम खूपच वेगळा असल्याचेही ती वेळी म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Parul Chauhann (@parulchauhan19)

याबद्दल पुढे बोलताना ती म्हणते की, “हा माझ्यासाठी वेगळा अनुभव असणार आहे. कारण अशा प्रकारची पौराणिक कथा प्रेक्षकांनी याआधी कधीही पाहिली नाही. त्यामुळे गरुड कथेचे अनेक रंजक किस्से प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मी जेव्हापासून मी कादुरीची भूमिका साकारत आहे. तेव्हापासून मला लोक या कथेबद्दल विचारत आहेत आणि कथा ऐकूण ते आश्चर्य चकित होत आहेत. त्यामुळे ही कथा खूपच दर्जेदार आहे. त्याचप्रमाणे या कथेची मांडणीही खूप भन्नाट आहे.”

View this post on Instagram

A post shared by Parul Chauhann (@parulchauhan19)

कार्यक्रमात आपल्या भूमिकेबद्दल बोलताना ती म्हणते की, “मी पहिल्यांदाच अशा प्रकारची नकारात्मक भूमिका साकारत आहे. त्यामुळे मला खूपच भिती वाटत आहे. याआधी माझ्या सगळ्या भूमिका प्रेमळ होत्या. या सगळ्या भूमिकांच्या उलट ही भूमिका आहे. पहिल्या दिवशीचा लूक, आणि अभिनय पाहून मी खूपच चिंतेत होती. पण तरीही ही भूमिका साकारताना मला आनंद होत आहे. यावेळी प्रेक्षक पारुलला वेगळ्या भूमिकेत पाहतील. जिचा रुबाब आणि अभिनय सगळाच वेगळा असेल.” दरम्यान याआधी पारुलने अनेक मालिकांमध्ये प्रेमळ भूमिका साकारल्या होत्या, ज्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post