काय सांगता! ‘अनुपमा’ मालिकेत होणार सारा अली खानची एन्ट्री, वाचा सविस्तर


रुपाली गांगुली ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती ‘अनुपमा‘ या मालिकेद्वारे तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. रुपालीने साकारलेली अनुपमाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेतील अनुज आणि अनुपमाच्या प्रेम कहानीला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. ‘अनुपमा’ ही मालिका सध्या टीआरपीमध्येही अव्वल आहे. शुक्रवारच्या (२४ डिसेंबर) एपिसोडमध्ये या मालिकेत प्रेक्षकांसाठी काहीतरी खास घडणार आहे.

मागील काही दिवसात मालविका तिचा भाऊ अनुज याच्याशी भांडण करून रागामध्ये घर सोडून जाते. याच्या पुढच्या एपिसोडमध्ये अनुज आणि अनुपमा (Anupamaa) म्हणजेच रुपाली गांगुली (Rupali Ganguly) दोघे मिळून मालविकाला शोधायला निघतात. अनुपमा रस्त्यामध्ये एका मंदिरात थांबते आणि मालविका भेटावी म्हणून देवाकडे प्रार्थना करते. त्यावेळी मंदिरातून बाहेर पडताना तिला एक मुलगी धडकते. ही मुलगी दुसरी कोणी नसून रिंकू सूर्यवंशी म्हणजेच सारा अली खान (Sara Ali Khan) आहे.

अनुपमाला धडकताच रिंकू सूर्यवंशी तिच्या समस्या तिला सांगू शकते. तुम्ही विचार करत असाल की, कोण आहे ही रिंकू? तर रिंकू ही शुक्रवारी (२४ डिसेंबर) प्रदर्शित होणाऱ्या ‘अतरंगी रे’ चित्रपटातील मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री सारा अली खान आहे. ती आज या मालिकेत दिसणार आहे. दरम्यान रिंकू अनुपमाला जे काही सांगते, ते ऐकून अनुपमादेखील आश्चर्यचकित होते. रिंकू अनुपमाला बोलते की, ती अतरंगी आहे. याच दरम्यान रिंकूला काही तरी आठवते आणि ती पळत निघून जाते.

यानंतर अनुपमा परत अनुजकडे जाते. ती त्याला विचारते भांडणांमध्ये अक्षयचे नाव आले होते तो कोण आहे? या प्रश्नावर अनुज असे बोलतो की, अक्षय तो मुलगा आहे, ज्याच्याशी मालविका प्रेम करते. मात्र, तो मुलगा फक्त पैशावर प्रेम करतो. अनुजला त्याचे खरे रूप माहिती असते, पण अक्षयला तिच्या जीवनातून वेगळे करण्याचे कारणही मालविका अक्षयलाचा दोष देत असते.

त्याचदरम्यान शाह कुटुंबामध्ये काव्या वारंवार पुन्हा एकदा वनराज याचे प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून ती स्वयंपाक घरात जाऊन जेवण बनवत असते. बादेखील तिच्यातल्या बदल पाहत असते. याच दरम्यान वनराज तिला असे बोलतो की, ती अनुपमा बनून माझे मन जिंकू शकत नाही. हे ऐकून काव्या परत चिंतेत पडते.

त्यानंतर मालविका शाह कुटुंबामध्ये एन्ट्री घेते. ते वनराजला त्याच्या घरात राहण्यासाठी त्याची परवानगी मागेल. ती बा, बापूजी आणि वनराज या सर्वांचे मन जिंकणार आहे. त्यानंतर वनराज तिला घरात राहण्याची परवानगी देईल आणि हे सर्व पाहून काव्या आश्चर्यचकित होईल.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!