Thursday, April 24, 2025
Home टेलिव्हिजन गजबच! १५ मिनिटात लग्न आणि ४ तासात मेहंदी, ‘असा’ घाईघाईत पार पडलेला ‘अनुपमा’चा लग्नसोहळा

गजबच! १५ मिनिटात लग्न आणि ४ तासात मेहंदी, ‘असा’ घाईघाईत पार पडलेला ‘अनुपमा’चा लग्नसोहळा

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’मधील भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रुपाली गांगुली हिने सन २००० मध्ये ‘सुकन्या’ या मालिकेतून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. यानंतर तिने ‘संजीवनी’ आणि ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकांमध्ये काम करताना छोट्या पडद्यावर वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, ‘अनुपमा’मुळे ती सर्वात यशस्वी अभिनेत्री बनली आहे, यात काही शंकाच नाही.

रुपाली पोहोचली मिका सिंगच्या शोमध्ये
नुकतीच ‘अनुपमा’ (Anupamaa) फेम रुपाली गांगुली (Rupali Ganguly) बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मिका सिंगच्या (Mika Singh) स्वयंवर शो ‘स्वयंवर: मिका दी वोहटी’ (Swayamvar: Mika Di Vohti) यामध्ये पोहोचली, जिथे तिने तिच्या झटपट लग्नाची मजेशीर कहाणी सांगितली. अभिनेत्रीने सांगितले की, तिने कसे तिच्या प्रेमासाठी अश्विन. के. वर्माची (Ashwin.K. Varma) १२ वर्षे वाट पाहिली आणि तो भारतात येताच त्यांनी अचानक एक-दोन दिवसात लग्न केले होते. ती म्हणाली, “माझं लग्न अगदी अपारंपरिक पद्धतीने झालं होतं. मी १२ वर्षे माझ्या पतीची वाट पाहिली होती. तो अमेरिकेत होता आणि मला भारतातच राहण्याची इच्छा होती.”

तब्बल १२ वर्षे पाहिली होती वाट
यापुढे ती म्हणाली की, “तो ४ फेब्रुवारी, २०१२ रोजी भारतात आला आणि ‘एखाद्या दिवशी आपण लग्न करू’ असे त्याने मला सांगितले. मी मालिकांमध्ये काम करत होते. मी निर्मात्यांकडे दोन दिवसांची रजा मागितली. तो म्हणाला, ‘तुझी मालिका सुरू आहे, तू सुट्टी कशी घेणार? तुला सुट्टी कशाला हवी आहे?’ मला त्यांना सांगावे लागले की, मी लग्न करत आहे. आम्ही आमच्या पालकांना सांगितले. लग्नसोहळा होणार नाही म्हणून मी खूप अस्वस्थ होते. मी माझ्या मालिकेचा भाग शूट केला आणि दोन दिवस सुट्टी घेतली.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rups (@rupaliganguly)

१५ मिनिटांत लग्न, ४ तासांची मेहंदी
रुपाली गांगुलीने तिच्या १५ मिनिटांच्या लग्नाची आणि ४ तासांच्या मेहंदीचाही किस्सा देखील सांगितला. ती म्हणाली, “मी रात्री ४ वाजेपर्यंत भरपूर मेहंदी लावली आणि त्याचवेळी हळदीचा समारंभही झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता रजिस्ट्रार येणार होता. मी सकाळी गेले आणि माझ्या लग्नाची साडी खरेदी केली. मी त्यांना एक ब्लाऊज दिला आणि म्हणाले, हा ब्लाऊज तयार आहे, याच्याशी जुळती एखादी साडी मला द्या.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rups (@rupaliganguly)

हिरा आहे माझा पती
रुपालीने कसंतरी घाईघाईत लग्नाची साडी घेतली होती, पण तिचा नवरा फॉर्मल कपड्यात लग्नाच्या मंडपात बसला होता. ती म्हणाली, “माझ्या पतीला उशीर झाला होता. तो हवाईयन शर्ट आणि जीन्समध्ये लग्नाला आला होता. त्याला वाटलं फक्त सही करायची आहे. माझ्या वडिलांनी मला लग्नाच्या १५ मिनिटांपूर्वी सांगितले की, त्यांना कन्यादान करायचं आहे. पंडित नव्हते, कसा तरी आम्ही एक पंडित पकडला, जो माझ्यापेक्षा जास्त व्यस्त निघाला. अश्विनने गाडी उभी केली नाही, तोवरच पंडित खाली धावत गेला आणि मंत्र म्हणू लागला. त्यामुळे माझं लग्न १५ मिनिटांत आणि मेहंदी ४ तासांत झाली, पण माझा पती एक हिरा आहे, जो मला नेहमीच सपोर्ट करतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rups (@rupaliganguly)

रुपाली गांगुली ‘अनुपमा’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचली आहे आणि प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान तिने निर्माण केलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

नाकातून गातो म्हणून टीकेचा धनी ठरणाऱ्या हिमेशला ‘भाईजान’ने दिलेला पहिला ब्रेक, १२० सिनेमांना दिलंय संगीत

वडील अभिनेते असूनही सूर्याने केले कापड गिरणीत काम, स्वत:च्या हिमतीवर बनवली वेगळी ओळख, आज आहे सुपरस्टार

रणवीरच्या ‘त्या’ फोटोंवर अखेर पुनम पांडे बोललीच, म्हणाली ‘तू तर मलाच…’

हे देखील वाचा